Arjun Tendulkar: "अर्जुनला खेळताना पाहून चॅम्पियन बापाला...", Sourav Ganguly चं ट्विट चर्चेत!

Arjun Tendulkar IPL Debut : अर्जुनला (Arjun Tendulkar) मुंबईसाठी खेळताना पाहून खूप आनंद झाला. चॅम्पियन वडिलांचा (SachinTendulkar) नक्कीच अभिमान वाटत असेल. त्याला खूप खूप शुभेच्छा, असं म्हणत सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) सचिन तेंडूलकरला टॅग केलं आहे.

Updated: Apr 16, 2023, 05:24 PM IST
Arjun Tendulkar: "अर्जुनला खेळताना पाहून चॅम्पियन बापाला...", Sourav Ganguly चं ट्विट चर्चेत! title=
Arjun Tendulkar, SachinTendulkar, Sourav Ganguly

Arjun Tendulkar Makes Debut: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (Mi vs kkr) यांच्यात सामना खेळवला जात आहे. या सामन्यात क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडूलकरचा (SachinTendulkar) मुलाला म्हणजेच अर्जुन तेंडूलकर (Arjun Tendulkar) याला संधी देण्यात आली आहे. अर्जुनने कोलकाताविरुद्ध डेब्यू (Arjun Tendulkar Makes Debut) केला. त्यामुळे अर्जुन कसा खेळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. तर अर्जुनचा पहिला सामना असल्याने अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

अर्जुनचा डेब्यू (Arjun Tendulkar IPL Debut) झाल्याची माहिती मिळताच बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि टीम इंडियाचा स्टार सलामीवीर फलंदाज सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) ट्विट करत अर्जुन तेंडूलकरला खास शुभेच्छा दिल्या आहेत.

काय म्हणाला Sourav Ganguly ?

अर्जुनला (Arjun Tendulkar) मुंबईसाठी खेळताना पाहून खूप आनंद झाला. चॅम्पियन वडिलांचा (SachinTendulkar) नक्कीच अभिमान वाटत असेल. त्याला खूप खूप शुभेच्छा, असं म्हणत सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) सचिन तेंडूलकरला टॅग केलं आहे.

पाहा ट्विट -

दरम्यान, मुंबईचा नियमित कर्णधार रोहित शर्माकडून (Rohit Sharma) अर्जुनला डेब्यू कॅप देण्यात आली. अर्जुनला डेब्यू सामन्यात सपोर्ट करण्यासाठी बहीण सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) देखील स्टेडिययमध्ये उपस्थित असल्याचं दिसून आलं. तर सामना सुरु होण्यापूर्वी वडील सचिन तेंडुलकरने मुलाला सल्ला देताना दिसले.