मुंबई : क्रिकेटच्या मैदानातून निवृत्ती घेतलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सोशल मीडियावर मात्र चांगलाच अॅक्टिव्ह असतो. आपल्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडिओ तो शेअर करीत असतो. नुकताच त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्याचे चार लूक पाहायला मिळत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेटच्या मैदानात असताना कुरळे केस आणि क्लिन शेव्हमध्ये सचिनला पाहण्याची क्रिकेट रसिकांना सवय झाली. पण वाढलेले केस, वाढलेली पांढरी दाढी अशा लूकमध्ये सचिन तेंडुलकरला फारच थोड्या लोकांनी पाहिलेलं असेल. कोरोनाच्या काळात सचिनचा नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सचिनच्या या लूकची चर्चा सगळीकडेच झाली.


पण आता सचिनने सोशल मीडियावर तीस सेकंदाचा एक व्हिडिओ टाकला आहे. या व्हिडिओत सचिनचे चार लूक्स पाहिला मिळतायत. या व्हिडिओत दाढी आणि मिशा वाढलेल्या लूकमध्ये सचिन येतो आणि त्यानंतर लगेचच दुसऱ्या लुकमध्ये तो फ्रेंच कटमध्ये दिसतो. तर तिसऱ्या लूकमध्ये छोटी दाढी आणि मिशीत दिसून येतो आणि शेवटी पूर्ण क्लीन शेव केल्याचं दिसत आहे.



'30 सेकंदात गायब, काहीच कायमस्वरूपी टिकत नाही. मला क्लीन शेव आवडते. तुमचं काय' अशी कॅप्शन त्याने लिहीली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.