IND vs AUS: Suryakumar Yadav चा Test Debut.. मास्टर ब्लास्टरचा आनंद गगनात मावेना, म्हणाला..
Sachin Tendulkar On Suryakumar Yadav: आगामी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलची (World Test Championship) दृष्टीने हे सामने महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे आता सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav Test Debut) खेळीवर सर्वांचं लक्ष लागलंय.
IND vs AUS: टीम इंडियाने नागपूर कसोटीसाठी (Nagpur Test) टी-ट्वेंटी स्पेशलिस्ट सूर्यकुमार यादवचा प्लेइंग इलेव्हनमध्ये (Suryakumar Yadav Test Debut) समावेश केलाय. त्याच्या कारकिर्दीतील ही पहिलीच कसोटी आहे. शुभमन गिलऐवजी सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) संधी देण्यात आली आहे. त्यामुळे 175 च्या स्टाईक रेटने खेळणाऱ्या सूर्याची खऱ्या अर्थाने कसोटी असणार आहे. सूर्याला संधी देण्यात आलेल्याने सर्वांच्या नजरा सूर्याच्या खेळीवर असणार आहे. अशातच आता मास्टर ब्लास्ट सचिन तेंडूलकरने (Sachin Tendulkar On Suryakumar Yadav) मोठं वक्तव्य केलंय.
काय म्हणाला Sachin Tendulkar ?
सलामीसाठी शुभमन गिलसोबत (Shubman Gill) केएल राहुल (KL Rahul) हा एक चांगला पर्याय आहे, असं सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) म्हणाला आहे. सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) खेळताना पाहिलेला प्रत्येकजण या खेळाडूच्या कौशल्याच्या प्रेमात पडला असा तो आहे. कसोटी क्रिकेट वेगळं आहे, पण सूर्यकुमार यादव या फॉरमॅटसाठी (Suryakumar Yadav Test Debut) तयार आहे, असं मला वाटतं, असं मत सचिन तेंडूलकरने व्यक्त केलंय. शुभमन गिल व्यतिरिक्त केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव हे खेळाडू कसोटी क्रिकेटसाठी उत्कृष्ट पर्याय आहेत. सूर्यकुमार यादवसारखे खेळाडू कसोटी फॉर्मेट खेळण्यासाठी सज्ज आहेत, असंही तो म्हणालाय.
मागील वर्षी आणि यंदाच्या वर्षी विराट कोहलीने (Virat Kohli) ज्या पद्धतीने फलंदाजी केली, त्यामुळे मी खूश आहे. विराट कोहलीने श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत डोळ्याचं पारणं फेडणारा खेळ केला. गेल्या काही महिन्यांत या खेळाडूने ज्या प्रकारचा खेळ दाखवला आहे तो वाखाणण्याजोगा होता, असं म्हणत सचिनने विराटचं कौतूक केलंय. ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराट कोहली (Virat Kohli) आणि सूर्यकुमार यादव या दोघांची फलंदाजी मला पाहायला आवडेल, असंही सचिन म्हणालाय.
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (IND vs AUS) तब्बल दोन वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये (Test Cricket) आमने सामने आले आहे. आगामी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलची (World Test Championship) दृष्टीने हे सामने महत्त्वाचे असणार आहेत. भारताला ही मालिका 3-0 च्या फरकाने जिंकवी लागणार आहे. त्यामुळे आता रोहितसेनेच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागलंय.