IND vs AUS: KL नव्हे Shubman Gill ला घ्या, Ravi Shastri स्पष्टच बोलले..उपकर्णधार आहे म्हणून...

Ravi Shastri On KL Rahul: मी गिल  (Shubman Gill) आणि राहुल (KL Rahul) यांना नेटमध्ये जवळून पाहिलंय. कठोर निर्णय घ्यावा लागला तरी मी फूटवर्क आणि टायमिंग पाहतो. राहुलपेक्षा गिलला प्राधान्य द्यावं, असं शास्त्री म्हणतात.

Updated: Feb 9, 2023, 11:06 AM IST
IND vs AUS: KL नव्हे Shubman Gill ला घ्या, Ravi Shastri स्पष्टच बोलले..उपकर्णधार आहे म्हणून...
Ravi Shastri ,KL Rahul

India vs Australia 1st Test: आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनच्या फायनलपर्यंत (ICC World Test Championship Final 2023) पोहोचण्यासाठी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) उद्यापासून होणाऱ्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये (Border-Gavaskar Trophy 2023) भिडणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला सामना नागपूरच्या मैदानावर खेळवला जाईल. काहीही करून टीम इंडियाला ही मालिका 3-0 च्या फरकाने जिंकावी लागेल. त्यासाठी रोहितसेना तयार असल्याचं दिसतंय. मात्र सर्वांना प्रश्न पडलाय. प्लेइंग इलेव्हनमध्ये (Playing XI) खेळणार कोण?

सामन्यासाठी मैदानात कोणला खेळवावं? असा प्रश्न टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माला (Rohit Sharma) पडलाय. कारण सध्या अनेक पर्याय उपलब्ध असल्याने कॅप्टन कोणावर डाव खेळणार, हे पाहणं औत्सुक्याचं असेल. अशातच आता टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी मोठं वक्तव्य केलंय. रवी शास्त्रीला असं वाटतं की जर शुभमन गिल (Shubman Gill) नेट्समध्ये केएल राहुलपेक्षा (KL Rahul) चांगली फलंदाजी करत असेल तर त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत सलामीवीर म्हणून खेळवलं पाहिजे. (Ravi Shastri picks shubman gill over kl rahul)

काय म्हणाले Ravi Shastri ?

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात उपकर्णधार केएल राहुलपेक्षा (Vice Captain KL Rahul) शुभमन गिलला प्राधान्य दिलं पाहिजे. गिलसारखा फलंदाज सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. उपकर्णधारपदाचा अर्थ संघातील जागा सुरक्षित आहेच असं नसावं, असंही शास्त्री (Ravi Shastri On KL Rahul) म्हणाले आहेत. पाचव्या क्रमांकावर असलेल्या सूर्यकुमार यादवच्या जवळ कोणीही नाही आणि त्याला या क्रमाने मैदानात उतरवलं पाहिजे, असा सल्ला देखील त्यांनी दिलाय.

आणखी वाचा - ICC WTC Final : तारीख जाहीर, जागाही ठरली... 'या' दिवशी रंगणार फायनलचा थरार!

दरम्यान, मी गिल  (Shubman Gill) आणि राहुल (KL Rahul) यांना नेटमध्ये जवळून पाहिलंय. कठोर निर्णय घ्यावा लागला तरी मी फूटवर्क आणि टायमिंग पाहतो. राहुलपेक्षा गिलला प्राधान्य द्यावं. जेव्हा एखादी व्यक्ती इतकी चमकदार कामगिरी करत असते तेव्हा फॉर्मला खूप महत्त्व असते, असं म्हणत रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी आपलं मत मांडलं. मात्र, त्यांनी बोललेली गोष्ट ही लाख मोलाची आहे, असं मानलं जातंय.