सचिनची ती भविष्यवाणी खरी ठरली!
श्रीलंकेविरुद्धची तिसरी टेस्ट भारतानं इनिंग आणि १७१ रन्सनी जिंकली.
मुंबई : श्रीलंकेविरुद्धची तिसरी टेस्ट भारतानं इनिंग आणि १७१ रन्सनी जिंकली. याचबरोबर ही टेस्ट सीरिज ३-०नं जिंकण्याचा विक्रमही भारतानं केला. तिसऱ्या टेस्टमधल्या भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला हार्दिक पांड्या. हार्दिक पांड्यानं ९६ बॉल्समध्ये १०८ रन्सची अफलातून खेळी केली. याचबरोबर एक विकेटही घेतली. याचबरोबर हार्दिकनं या सीरिजमधून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पदार्पणाच्या पहिल्याच टेस्टमध्ये हार्दिकनं चार विकेटही घेतल्या होत्या.
याआधी हार्दिकनं वनडे, टी20 आणि आयपीएलमध्येही वादळी खेळी केल्या आहेत. पण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं पांड्याबद्दल त्याच्या पदार्पणाआधीच भविष्यवाणी केली होती.
विक्रम साठे यांचा टॉक शो What The Duckमध्ये खुद्द विक्रम साठे यांनीच हा खुलासा केला आहे. या टॉक शोमध्ये विक्रम साठेंनी हार्दिक पांड्यालाच सचिन तेंडुलकरचा हा किस्सा सांगितला.
तुझं क्रिकेटमध्ये पदार्पणही झालं नव्हतं तेव्हा सचिननं मला तुझ्याबद्दल सांगितल्याचं विक्रम साठेंनी हार्दिकला सांगितलं. विमानातून जात असताना विक्रम साठेंनी सचिनला युवा क्रिकेटपटूंबद्दल विचारलं. तेव्हा सचिननं हार्दिकचं नावं घेतलं. एक मुलगा आहे हार्दिक पांड्या, जेव्हा शॉट मारतो तेव्हा कोणी हातही मधे घालत नाही. एकदा नेटमध्ये जाऊन बघ, असं सचिननं विक्रम साठेंना सांगितलं होतं.
पाहा काय म्हणाले होते विक्रम साठे