मुंबई : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोरोना व्हायरस संसर्गातून बरे झाल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर  हॉस्पिटलमधून घरी परतला आहे. गेल्या महिन्यात 27 मार्च रोजी सचिनला कोरोन व्हायरसची लागण झाली होती. यानंतर 2 एप्रिल रोजी खबरदारी म्हणून त्याला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर सचिन  डॉक्टरांच्या देखरेखी खाली रुग्णालयात  होता. आता सचिनला तब्बल आठवडाभरानंतर हॉस्पिटलमधून सोडण्यात आले आहे. गुरुवारी 8 एप्रिल रोजी सचिनने स्वत: ट्विट करुन याबद्दल माहिती दिली.


गुरुवारी रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सचिन तेंडुलकरने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक निवेदन प्रसिद्ध केले, ज्यात त्यांनी लिहिले की, "मी नुकताच दवाखान्यातून घरी परतलो आहे आणि काही काळ मी आयसोलेटेड राहूण विश्रांती घेईन, आणि पूर्णपणे बरे होईन. आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. "


आरोग्य कर्मचार्‍यांसाठी कृतज्ञता व्यक्त केली


सचिनने रुग्णालयाच्या वैद्यकीय कर्मचार्‍यांनी त्याची काळजी घेतल्याबद्दल आभार मानले आणि त्यांचे गेल्या एक वर्षापासून साथीच्या आजारा विरूद्ध सुरू असलेल्या संघर्षाबद्दल अभिनंदन केले. तो म्हणाला, "ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी माझा काळजीपूर्वक सांभाळ केला आणि गेल्या एका वर्षापासून या कठीण परिस्थितींचा स्थिरपणे सामना करीत असलेल्या आभारी कर्मचाऱ्यांचे मी आभार मानतो"



सचिनसह 4 माजी क्रिकेटपटूंना संसर्ग झाला


सचिन तेंडुलकरला गेल्या महिन्यातच कोरोना संक्रमण झाले होते. तो रायपूरमधून रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज खेळून परतला. त्यांनंतर या स्पर्धेत सचिनचे साथीदार असलेले युसुफ पठाण, सुब्रमण्यम बद्रीनाथ आणि इरफान पठाण हे देखील या संक्रमणात अडकले. ते सर्व आपाआपल्या घरांमध्ये आयसोलेटेड आहेत.