मुंबई : भारतीय क्रिकेटर आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर 2013 साली इंटरनेशनल क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. सचिनच्या निवृत्तीने संपूर्ण देश हळहळला होता. वेस्ट इंडिज विरूद्धचं सचिनने त्याचा शेवटचा सामना खेळला होता. दरम्यान यावेळी विराट कोहलीने त्याला एक भेटवस्तू दिली होती. तर या गिफ्टबद्दल आता सचिनने मोठा खुलासा केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्यावेळी सचिनने निवृत्ती घेतली त्यावेळी अनेकजण भावूक झाले होते. यावेळी विराटने सचिनला एक गिफ्ट दिलं होतं. मात्र सचिनने हे गिफ्ट विराटला परत केलं. 


याबाबत सचिन तेंडुलकर म्हणाला, "मी त्यावळी खरंच खूप भावूक झालो होते. मी भिंतीला डोकं टेकवलं होतं आणि डोळ्यातील पाणी पुसत होतो. त्यावेळी विराट माझ्याजवळ आला आणि त्याने मला त्याच्या वडिलांनी दिलेला एक पवित्र धागा मला दिला."


"मी काही वेळ तो धागा माझ्याजवळ ठेवला आणि त्यानंतर तो विराटला पुन्हा देऊन टाकला. मी विराटला म्हणालो, की हा अमूल्य धागा तुझ्याकडेच राहिला पाहिजे. ही तुझी संपत्ती आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत ती तुमच्यासोबत राहिली पाहिजे. तो खूप भावनात्मक क्षण होता आणि तो नेहमी माझ्या लक्षात राहिलं.", असंही सचिनने सांगितलं.


सचिन तेंडुलकर हा वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. तसंच सचिन तेंडुलकर नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतकं आहेत.