मुंबई : जगभरात कोरोनाचा कहर सुरु असल्याने अनेक देशांमध्ये गेल्या २ महिन्यापासून लॉकडाऊन लागू होते. संचारबंदी असल्याने ४ हून अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई होती. कोरोनाचा परिणाम आज सगळ्या क्षेत्रांवर पाहायला मिळतो आहे. अनेक व्यापार ठप्प आहेत. अर्थव्यवस्था ढासळली आहे. त्यातच क्रीडा क्षेत्रावर ही याचा मोठा परिणाम पाहायला मिळतो आहे. अनेक पूर्वनियोजित सामने रद्द करण्यात आले आहे. इतर देशांतून येणाऱ्या विमानांना बंदी घालण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेटवर देखील याचा मोठा परिणाम पाहायला मिळतो आहे. गेल्या २ महिन्यात अनेक मोठे टुर्नामेंट रद्द झाले आहेत. तर काही होणार की नाही यावर अजूनही संभ्रम आहे. वर्ल्डकप होणार की नाही याबाबत ही शंका आहे. आयपीएलवर देखील टांगती तलवार आहे. त्यातच भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरने वर्ल्डकपबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे. 


मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) ने शनिवारी म्हटलं की, 'टी-20 वर्ल्डकप बाबतचा निर्णय ऑस्ट्रेलियाला घ्यावा लागेल असं म्हटलं आहे. आयसीसी याचा निर्णय घेईल. पण ऑस्ट्रेलियामध्ये कोरोनावर नियंत्रण मिळवल्यानंतर ऑस्ट्रेलियात वर्ल्डकप होण्याच्या शक्यता वाढल्या आहेत.'


'टी-20 वर्ल्डकप बाबत बोलायचं झालं तर मला वाटतं की याचा निर्णय ऑस्ट्रेलियाला घ्यायचा आहे. की ते टुर्नामेंट घेऊ शकतात की नाही. आर्थिक आणि इतर बाबींवर देखील गंभीरतेने विचार करण्याची गरज आहे. हा कठीण निर्णय आहे. पण क्रिकेट होत आहे ही मोठी गोष्ट आहे.' सचिनने जुलैमध्ये होणाऱ्या इंग्लंड आणि वेस्टइंडीज टेस्ट सीरीजबद्दल ही उल्लेख केला.