मुंबई : विराट कोहलीनंतर कर्णधारपद आता रोहित शर्माच्या हातात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोहालीच्या मैदानात रोहित शर्माने कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळताना द्विशतकही झळकावले.  


सचिनने केले कौतुक  


मोहालीच्या मैदानात रोहित शर्माने तिसर्‍यांदा द्विशतक झळकवल्यानंतर अनेकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान क्रिकेटचा देव समजला जाणार्‍या सचिन तेंडुलकरनेदेखील रोहितचं कौतुक केले आहे.  



 


'तुझा खेळ पाहताना खूप आनंद होतो' अशा आशयाचे ट्विट सचिनने केले आहे.  


खरी झाली भविष्यवाणी 


२०१० मध्ये सचिन तेंडुलकरने वनडेमध्ये पहिल्यांदा डबल सेंचुरी केली होती. त्यावेळेस तुझा हा विक्रम कोण मोडेल ? असा प्रश्न सचिनला विचारला होता. त्यावेळेस सचिनने रोहित शर्माचे नाव घेतले होते. आज सचिनने रोहितवर दाखवलेला विश्वास अखेर खरा करून दाखवला आहे. 


सचिनला टाकलं मागे



मोहालीमधली रोहितची ही वनडे करिअरमधली १६ वी सेंच्युरी आहे. सचिनने १६ व्या सेंच्युरीसाठी १८५ इनिंग खेळल्या होत्या. पण रोहितने १८ इनिंग आधीच हा कारनामा केला आहे.