Asia Cup 2022 India Vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघात 10 महिन्यानंतर सामना होणार आहे. मागच्या टी 20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्ताननं भारताला पराभूत केलं होतं. त्यामुळे आशिया कप स्पर्धेतील सामन्यापूर्वी दोन्ही संघांचे चाहते सोशल मीडियावर भिडले आहेत. काही जणांनी मीम्स शेअर करत एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. दरम्यान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सामन्यापूर्वी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमुळे दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांशी कसे वागतात? हे दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 2003 वर्ल्डकप स्पर्धेदरम्यानचा फोटो ट्वीट केला आहे. भारताने या सामन्यात पाकिस्तानला पराभूत केलं होतं. या सामन्यात सचिननं 98 धावांची खेळी केली होती. 



दुसरीकडे, वसिम जाफरने दोन लहान मुलं भांडत असल्याचं व्हिडीओ शेअर केला आहे. तर एक मोठी व्यक्ती त्या दोघांना तसं करण्यापासून रोखत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना वसिम जाफरनं लिहिलं आहे की, "आज भारत-पाकिस्तान संघाच्या चाहत्यांची अशी स्थिती आहे." ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. काही तासातच हजारो लोकांनी हा व्हिडीओ रिट्वीट केला आहे. तसेच हजारो लाईक्स मिळाले आहेत. 



टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन 
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल आणि अर्शदीप सिंह.