अर्जुन तेंडुलकरची मुंबई अंडर १९ टीमसाठी निवड
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची मुंबईच्या अंडर १९ टीमसाठी निवड झाली आहे.
मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची मुंबईच्या अंडर १९ टीमसाठी निवड झाली आहे.
अर्जुन वडोदरा येथे होणाऱ्या जेवाई लेले ऑल इंडिया अंडर १९ वन-डे टुर्नामेंटमध्ये भाग घेणार आहे. यापूर्वी अर्जुन तेंडुलकर मुंबईच्या १४ वर्षांखालील आणि १६ वर्षांखालील टीममधून खेळला आहे. मात्र, आता त्याची निवड अंडर १९ साठी करण्यात आली आहे.
जेवाई लेले वनडे टूर्नामेंट १६ सप्टेंबरपासून वडोदरा येथे सुरु होणार आहे आणि २३ सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे.
अर्जुन तेंडुलकर गेल्या काही दिवसांपासून लंडनमध्ये फास्ट बॉलिंगचे प्रशिक्षण घेत होता. त्याने अंडर १४ आणि अंडर १६ या टीम्समध्ये आपली जबरदस्त कामगिरी यापूर्वीच दाखवली आहे.
अर्जुन तेंडुलकरने इंग्लंडमध्ये अनेक मोठ्या बॅट्समनसोबत नेट प्रॅक्टीस केली आहे. त्याने जॉनी बेयरस्टोला असा एक बॉल टाकला होता जो खेळण्यासाठी जॉनीकडे कुठलाच पर्याय नव्हता. अर्जुनने टाकलेल्या या यॉर्करनंतर प्रत्येकजण त्याचं कौतुक करत आहे.