मुंबई : क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडुलकरच्या नावावर आज अनेक रेकॉर्ड्स आहेत. सचिनच्या रेकॉर्डजवळ भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली देखील पोहोचत आहे. सचिनचा 49 वनडे शतकांचा रेकॉर्ड लवकरच विराट मोडेल असं बोललं जातंय. सचिनला देखील त्याची उत्सूकता आहे. सचिनने मुंबईत एका पुस्तकाच्या प्रकाशनावेळी ही गोष्ट बोलून दाखवली. सचिनच्या नावावर वनडे इंटरनॅशनलमध्ये 49 शतकांचा रेकॉर्ड आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सचिनने म्हटलं की, 'जर विराट वनडेमध्ये माझा शतकांचा रेकॉर्ड मोडेल तर मी त्याला शॅम्पेन गिफ्ट करेल.' विराट कोहलीने आतापर्यंत वनडे करिअरमध्ये 35 शतक ठोकले आहेत. सचिनचा रेकॉर्ड मोडण्यासाठी त्याला अजून 25 शतकांची गरज आहे. सचिनला विचारण्यात आलं होतं की, जर विराट त्याचा हा रेकॉर्ड मोडतो तर शॅम्पेनच्या 50 बाटल्या तो विराटला पाठवेल का?. यावर बोलतांना सचिनने म्हटलं की, 'नाही जर विराट हा रेकॉर्ड मोडतो तर मी स्वत: शॅम्पेनची बॉटल घेऊन त्याच्याकडे जाईल आणि त्याच्या सोबत सेलिब्रेट करेल.'


कोलकात्यामध्ये विराट कोहलीने म्हटलं होतं की, 'त्याच्या करिअरमध्ये सचिन तेंडुलकरचा प्रभाव आहे. माझ्या करिअरमध्ये खूप कमी लोकं माझ्या जवळ आहेत. हा एक जीवनप्रवास होता जो चालतच गेला. आणि हे स्वाभाविक आहे की, माझ्या कठीण काळात जो माझ्य़ा सोबत उभा राहिला तर मी त्याला महत्त्व देईल. आज मी जे काही आहे ते सचिनच्या प्रेरणेमुळे आहे. माझ्यासाठी स्वर्गापर्यंत पोहोचण्याची ती पायरी आहे. मिळवणं आणि जिंकणं माझ्यासाठी महत्त्वाची नाहीत. जर कोणी माझ्यासाठी ईमानदार आहे तर हे महत्त्वपूर्ण आहे.'