डेन्मार्क ओपन : सायनाची लढाई थांबली!
डेन्मार्क ओपन सुपर सीरिज प्रीमियरमध्ये भारताची फुलराणी सायना नेहवालची लढाई आज थांबलीय.
नवी दिल्ली : डेन्मार्क ओपन सुपर सीरिज प्रीमियरमध्ये भारताची फुलराणी सायना नेहवालची लढाई आज थांबलीय.
शुक्रवारी महिला एकेरीच्या क्वॉर्टर-फायनल मॅचमध्ये जपानच्या अकेने यामागुची हिनं सायनाला पराभूत केलंय.
यामागुचीसमोर सायना मोठं आव्हान उभं करू शकली नाही... आणि केवळ २९ मिनिटांत १०-२१, १३-२१ नं पराभूत झाली.
यासोबतच या टूर्नामेंटमध्ये भारतीय महिलांची आव्हानं समाप्त झालीत. यापूर्वी पी व्ही सिंधुला पहिल्याच राऊंडमध्ये चीनच्या चे युफीकडून पराभवाचा झटका बसला होता. यानंतर यामागुची आणि युफी सेमीफायनलमध्ये एकमेकींसमोर उभ्या ठाकणार आहेत.