हैदराबाद : वादविवादानंतर आता फुलराणी सायना नेहवाल पुन्हा गोपीचंद यांच्या अ‍ॅकॅडमीमध्ये परतली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१४ साली सायना आणि गोपिचंद यांच्यामध्ये मतभेद झाले होते. त्यानंतर सायना बेंगलुरुमध्ये विमल कुमार यांच्याकडे प्रशिक्षण घेत होती.  


गोपिचंद  आणि सायनामध्ये वाद  


दिल्लीमध्ये प्रीमियर बॅडमिंटन लीगच्या तिसर्‍या सिझनच्या लॉन्च समारंभामध्ये आयोजित एका सोहळ्यात सहभागी झाली होती. डेन्मार्कमध्ये   २०१४ विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या क्वॉर्टर फायनलमध्ये अपयश आल्यानंतर गोपिचंद आणि सायानामध्ये वाद झाला होता. हा वाद मीडियामध्ये रंगला होता.   


कारण काय ? 


गोपिचंद अकादमीमध्ये वापसी करण्याबाबत  मीडियाशी बोलताना माझी वापसी काही अनेक कारणांवर अवलंबून आहे. मी काही वर्षांपूर्वी ज्या स्तरावर होती. तेथे पुन्हा जाण्याचा प्रयत्न करणार आहे.