नवी दिल्ली : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ स्पर्धेच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केल्यानंतप पाकिस्तानी क्रिकेटर्सवर बक्षिसांचा वर्षाव होतोय. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी विजेत्या संघातील प्रत्येक क्रिकेटरला एक कोटी रुपये बक्षिसांची घोषणा केलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांनी संघातील प्रत्येक सदस्याला १० लाख रुपयांची घोषणा केलीये. याशिवाय पीसीबीने क्रिकेटरच्या मानधनातही वाढ केलीये.


२०१७-१८ वर्षासाठी ग्रेड ए, बी, सी, डीच्या सर्व क्रिकेटपटूंच्या मानधनात १० टक्क्यांची वाढ केलीये. नव्या नियमानुसार ए ग्रेडच्या क्रिकेटर्सना 6,50,000 पाकिस्तानी रुपये मिळणार आहेत. म्हणजेच त्यांचे वार्षिक उत्पन्न ७८ लाख पाकिस्तानी रुपये इतके होते. भारताच्या चलनानुसार ही रक्कम ४८ लाख रुपये इतकी आहे. बी ग्रेडच्या क्रिकेटर्सना वार्षिक ५२ लाख रुपये वेतन मिळणार आहे. 


ए ग्रेडमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, आर. अश्विन, अजिंक्य रहाणे, मुरली विजय, रवींद्र जडेजा आणि चेतेश्वर पुजारा यांना वर्षाला दोन कोटी रुपयांचे मानधन मिळते. यात सामना फीचा समावेश नाही. 


बीसीसीआयच्या २०१७-१८ आर्थिक वर्षात तीन श्रेणींमध्ये(ए, बी.सी) ३२ खेळाडूंचा समावेश केलाय. यात त्यांना ग्रेडनुसार अनुक्रमे दोन कोटी, एक कोटी आणि ५० लाख रुपयांचे वार्षिक मानधन दिले जाते.