`या` विदेशी क्रिकेटरने महात्मा गांधीजींचा चरखा फिरवला, फोटो आले समोर
महात्मा गांधी यांचा चरखा फिरवणारा `हा` विदेशी खेळाडू आहे तरी कोण?
अहमदाबाद : देशात अनेक क्रिकेट सामने होतात. या सामन्यासांठी विदेशातील अनेक खेळाडू देशात दाखल होत असतात. मात्र प्रत्येकवेळी सामने खेळून ते त्यांच्या मायदेशी परतता. मात्र ही घटना त्याला अपवाद ठरली आहे. कारण या घटनेत भारतात सामने खेळायला आलेल्या या विदेशी खेळाडूने थेट महात्मा गांधी यांच्या आश्रमाला भेट दिली आहे. यावेळी या खेळाडूने महात्मा गांधी यांचा चरखा देखील फिरवला. या खेळाडूचे चरखा फिरवतानाचे हे फोटो आता व्हायरल होत आहे. हा खेळाडू कोण आहे ते जाणून घेऊयात.
श्रीलंकेच्या महान खेळाडूंपैकी एक असलेल्या सनथ जयसूर्या हा भारतात होणाऱ्या लीजेंड़ क्रिकेट लीगमध्ये सहभागी होणार आहे. या लीगची सुरुवात 16 सप्टेंबर रोजी एका विशेष सामन्याने होणार आहे. इंडिया महाराजा स्कॉड आणि वर्ल्ड जायंट स्कॉड यांच्यात सामना होईल. सनथ जयसूर्या देखील इऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील वर्ल्ड जायंट संघाकडून खेळताना दिसणार आहे. त्याचबरोबर सौरव गांगुली इंडिया महाराजा संघाचे नेतृत्व करणार आहे.
लीजेंड़ क्रिकेट लीगसाठी सनथ जयसूर्या हा भारतात आला आहे. तो सध्या गुजरातमध्ये असून त्यांनी अहमदाबाद येथील महात्मा गांधींच्या आश्रमालाही भेट दिली होती. यावेळी जयसूर्याने महात्मा गांधी यांचा चरखाही फिरवला. या संदर्भात त्याने ट्विट केले की, "महात्मा गांधींच्या आश्रमाला भेट देणे हा नम्र अनुभव होता. त्यांचे जीवन आजही आपल्याला प्रेरणा देत आहे. आपण वर्तमानात काय करतो यावर भविष्य अवलंबून आहे", हे श्रीलंकेला लागू होते, हे आता पूर्वीपेक्षा अधिक घडते आहे, असे त्यांनी म्हटले.
जयसूर्याने रविवारी बीसीसीआय सचिव जय शाह यांची भेट घेतली आणि आपल्या देशातील क्रिकेटच्या समस्यांवर त्यांच्याशी चर्चा केली. जय शाह यांच्या भेटीचा फोटो शेअर करत जयसूर्याने लिहिले की, “भारतीय क्रिकेट बोर्डाचे सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांना भेटणे हा सन्मान आणि आनंद वाटला. इतक्या कमी वेळात आम्हाला भेटण्यास सहमती दिल्याबद्दल धन्यवाद. श्रीलंकेच्या क्रिकेटबद्दल काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर आम्ही चर्चा केली, असे त्यांनी म्हटले.
कारकिर्द
सनथ जयसूर्याने 2011 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. त्याने श्रीलंकेसाठी 110 कसोटी सामन्यांमध्ये 6,973 धावा केल्या, ज्यात 14 शतके आणि 31 अर्धशतकांचा समावेश आहे. 445 एकदिवसीय सामन्यांमध्ये जयसूर्याने 32.36 च्या सरासरीने 13,430 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटने 28 शतके आणि 68 अर्धशतके झळकावली. जयसूर्याने श्रीलंकेसाठी 31 टी-20 सामन्यांमध्येही भाग घेतला, ज्यामध्ये त्याने 629 धावा केल्या. जयसूर्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 440 विकेट आहेत.