नवी दिल्ली : भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा लवकरच आई होणार आहे. प्रेग्नंट असल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर सानिया सतत चर्चेत आहे. कधी तिनं सातव्या महिन्यात टेनिस खेळतानाचे फोटोशूट करत सर्वांनाच धक्का दिला होता. आपल्या आयुष्यातला हा क्षण आपण एन्जॉय करत असल्याचं सानिया म्हणतेय. एका मुलाखतीच्या निमित्तानं आता पुन्हा एकदा सानिया चर्चेत आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'एचटी ब्रंच'ला दिलेल्या एका मुलाखतीत सानिया मिर्झानं नुकतंच आपल्या खाजगी आयुष्यातील गोष्टी शेअर केल्यात. २०१० मध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकसोबत विवाह केल्यानंतर सानिया संकुचित विचारांच्या ट्रोलर्सच्या टीकेची धनीही ठरली होती... विवाहानंतर आठ वर्ष उलटल्यानंतरही या दोघांचा विवाह चर्चेत आहे. 


लग्नानंतर सोशल मीडियावर सतत ट्रोल केल्या जाण्यावर सानिया म्हणते, मी आणि शोएबनं भारत आणि पाकिस्तानच्या एकात्मतेसाठी विवाह केला नव्हता. लग्नानंतर आम्ही दोघंही आपापल्या देशांसाठी खेळतोय. मला ट्रोलचा काहीही फरक पडत नाही. मी भारताची मुलगी आहे आणि नेहमीच राहील. 


या मुलाखतीत सानिया-शोएबचं मूल भारतीय असेल पाकिस्तानी? असाही प्रश्न विचारण्यात आला. यावर तिनं उत्तर दिलं... 'सेलिब्रिटी असल्याकारणानं या पद्धतीचे टॅग्स पब्लिक लाईफचा एक भाग आहे. मी माझ्या देशासाठी, माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्यासाठी खेळते... आणि हेच शोएबही करतो. आम्हाला आमच्या जबाबदाऱ्या चांगल्याच कळतात. आम्ही या पद्धतीचे टॅग्स गंभीरतेनं घेत नाहीत. मीडियासाठी या चांगल्या हेडलाईन्स होऊ शकतील... पण आमच्याकडे त्यांना थारा नाही... घरी आम्ही अशा विषयांवर चर्चा करत नाही' 


शोएब मलिक गेल्या वर्ष इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी झाला होता. पाकिस्ताननं ही ट्रॉफी जिंकली होती... तर सानिया मिर्झानं भारताकडून सहा डबल्स टायटल्स आपल्या नावावर केलेत.  


सानियाचं बाळ ऑक्टोबर महिन्यात या जगात पहिलं पाऊल टाकू शकतं. साहजिकच सध्या सानियानं खेळातून तूर्तास ब्रेक घेतलाय