मुंबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवरील टीकेचे वादळ काही शमत नाहीये. एकापाठोपाठ एक अनेक खेळाडू त्याच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरुवातीला व्हीव्ही एस लक्ष्मण आणि अजित आगरकरने धोनीच्या खेळाबाबत सवाल उपस्थित केलाय. यात आता भारताचा माजी क्रिकेटर आणि कमेंटेटर संजय माजरेकरांनीही उडी घेतलीये. राजकोटमध्ये झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यानंतर धोनीच्या प्रदर्शनावर सातत्याने सवाल उपस्थित केले जातायत. 


या सामन्यात विराट वेगवान शॉट्स खेळत होता. मात्र त्याचवेळी धोनीला जलदगतीने धावा करता येत नव्हत्या. या सामन्यात भारतीय संघाला हार पत्करावी लागली. यानंतर धोनीवर जोरदार टीका सुरु केली. 


एकीकडे काही माजी क्रिकेटरनी धोनीच्या निवृत्तीच्या मागणीवर जोर धरला तर प्रशिक्षक आणि कर्णधार मात्र धोनीच्या बाजूने उभे राहिले. सेहवाग आणि गावस्करांच्या मते धोनी अजूनही क्रिकेट खेळू शकतो.  मांजरेकरांनीही धोनीच्या प्रदर्शनाबाबत सवाल उपस्थित केलेत. ईएसपीएन क्रिकइन्फोवर लिहिलेल्या कॉलमद्वारे त्यांनी ही टीका केलीये.


मांजरेकर म्हणाले, धोनीच्या आधीच्या सामन्यांमधील कामगिरीच्या तुलनेत त्याची आताची कामगिरी तितकीशी ठळक होत नाहीये. तसेच आधीसारखा धोनी गेमचेंजर राहिलेला नाही. धोनीमध्ये पहिल्यासारखी क्षमता राहिलेली नाही आणि जिंकण्यासाठी तो आता दुसऱ्यांवर अवलंबून राहायला लागलाय.