चेतन शर्मा यांच्या स्टिंग ऑपरेशननंतर Sanju Samson चं मोठं विधान; Rahul Dravid यांच्याबाबत केला खुलासा
एका कार्यक्रमादरम्यान संजू सॅमसनने सांगितलं की, मी 2013 मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी ट्रायल्स दिली होती. त्यावेळी मला फलंदाजी करावी लागली होती.
Sanju Samson: भारतीय क्रिकेट टीमचा विकेटकीपर संजू (Sanju Samson) ने क्रिकेटर म्हणून गेल्या काही वर्षांमध्ये स्वतःच्या खेळाने चांगली कामगिरी केली आहे. यासोबत टीम इंडियाचा पूर्व कर्णधार आणि सध्याचे माजी कोच राहुल द्रविड यांच्या भूमिकेबाबत स्पष्टता दिली आहे. यावेळी Sanju Samson ने कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्यासोबत असलेल्या बाँडिंगबाबत देखील मोठा खुलासा केला आहे.
माझ्या प्रत्येक शॉटचं कौतुक केलं जातं
एका कार्यक्रमादरम्यान संजू सॅमसनने सांगितलं की, मी 2013 मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी ट्रायल्स दिली होती. त्यावेळी मला फलंदाजी करावी लागली होती. तशी फलंदाजी मी माझ्या करियरमध्ये कधीच केली नाही. माझ्या प्रत्येक शॉटवर राहुल द्रविड टाळ्या वाजवून कौतुक करायचे. तो क्षण माझ्यासाठी खूप खास होता. टीममध्ये सिलेक्ट झाल्यानंतर 2013 सिझनमध्ये मी अनेकदा त्यांच्यासोबत फलंदाजी देखील केली.
द्रविड यांनी केलं होतं मार्गदर्शन
सॅमसन पुढे म्हणाला की, 2013 सिझनच्या नंतर एकदा मी फलंदाजीसाठी आलो तेव्हा राहुल द्रविड आधीच क्रीजवर उपस्थित होते. मी पहिल्याच बॉलवर फोर मारली, त्यानंतर ते मला म्हणाले, आधी बॉल पाहा आणि नंतर त्याच्या शॉटचा विचार कर. त्यानंतर पुढचा बॉल बाऊन्सर होता ज्यावर मी पुन्हा फोर मारला.
डायरीमध्ये नोट करून ठेवायचो मुद्दे- संजू
सॅमनसने पुढे सांगितलं की, मला विसरण्याची सवय आहे, त्यामुळे मी माझ्याजवळ एक डायरी ठेवतो. राहुल द्रविड मला जे काही सल्ले द्यायचा, ते मी सर्व नोट करून ठेवल आहेत. त्यामुळे मी माझा खेळ सुधारण्याचा प्रयत्न करतो. ती डायरी माझ्याकडे आजही आहे. मी 4 वर्ष राहुल द्रविड यांच्यासोबत घालवले असून ती वर्ष माझ्या करियरसाठी खूप महत्त्वाची आहेत.
सॅमसन स्वतःला द्रविडचा शिष्य मानतो. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार आणि त्यानंतर कोच असताना त्याने सॅमसनच्या शैलीवर खूप काम केलंय. सध्याच्या काळात तरूण फलंदाजांमध्ये संजू सॅमसन सर्वात आक्रमक आहे.