शुभमन गिलच्या अपयशाची धनी Sara Ali Khan? `गद्दार` म्हणत नेटकऱ्यांनी हिणवलं आणि...
Sara Ali Khan Troll : सारा अली खान ही सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. सारा काल आयपीएल फायनल पाहण्यासाठी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पोहोचली होती. तर कालच्या मॅचमध्ये शुभमन लवकर आऊट झाल्यानं नेटकऱ्यांनी साराला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
Sara Ali Khan Troll : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही सध्या तिचा आगामी चित्रपट 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सारा विकी कौशलसोबत IPL ची फायनल पाहण्यासाठी गेली होती. ही फायनल म्हणजे गुजरात टाइटंस आणि चेन्नई सुपरकिंग्स विरोधात होती. आता सारानं फायनल पाहण्यासाठी गेल्यानंतर सगळ्यांचे लक्ष याकडे होते की ती नक्की कोणाला पाठिंबा देते. कारण गेल्या काही दिवसांपासून गुजरात टाइटंस टीममधील शुभमन गील आणि सारा अली खान यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु होत्या. त्यांचे फोटो देखील व्हायरल झाले होते. त्यानंतर अचानक शुभमनचं नाव सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरशी जोडण्यात आलं. पण शुभमन नक्की कोणाला डेट करत आहे हे कळलेच नाही. पण मॅच पाहण्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये गेलेल्या साराला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.
आयपीएलच्या फायनलमध्ये शुभमन गिल टीम गुजरात टायटंस आणि चेन्नई सुपरकिंग्स विरोधात होती. तर गुजरातच्या अहमदाबाद येथे सुरु असलेल्या पावसामुळे मॅचमध्ये अडथळा निर्माण झाला होता. पण चाहत्यांचा उत्साह काही कमी झाला नाही. रवींद्र जडेजा आणि धोनी यांनी त्यांच्या अंदाजात फक्त मॅच जिंकली नाही तर त्यासोबतच सगळ्यांची मने देखील जिंकली. साराला नेटकऱ्यांनी यासाठी ट्रोल केले कारण शुभमन हा फायनल मॅचमध्ये लवकर आउट झाला. धोनीनं इतक्या पटकन त्याला स्टंप आउट केलं की शुभमन लवकर पवेलियनला परत गेला. तर त्याआधीच्या मॅचमध्ये शुभमननं मुंबई इंडियन्स विरोधात चांगली कामगिरी केली होती. त्यानं मुंबई विरोघात 129 रन केले तर चेन्नई विरोधात फक्त 39 रन केले. त्यामुळे नेटकऱ्यांनी साराला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
खरंतर विकी कौशलनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत सारा अली खान आणि विकी हे दोघं चेन्नईच्या विजयानंतर आनंदानं सेलिब्रेशन करताना दिसत आहे. तर दुसरीकडे गुजरातच्या अपयशाचं साराला थोडं पण वाईट वाटलं नाही असं अनेक नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. इतकंच काय तर अनेकांनी कमेंट करत सारा मॅच पाहायला आली म्हणून शुभमन लवकर आऊट झाला असे म्हटले आहे. या व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, सारा दीदी बेवफा है. दुसरा नेटकरी म्हणाला आधी हे दोघं गुजरातला पाठिंबा देत होते आता अचानक कॅमेऱ्यासाठी चेन्नईला पाठिंबा देत आहेत. तिसरा नेटकरी म्हणाला, शुभमन गिलसोबत साराचा खरंच ब्रेकअप झाला आहे का? आणखी एक नेटकरी म्हणाला, गद्दार.