मुंबई : क्रीडा विश्वातून सर्वांत मोठी बातमी समोर आली आहे. एका स्टार खेळाडूचं निधन झाल्याची दुदैवी घटना घडलीय. वयाच्या 30 व्या वर्षी या स्टार खेळाडूने अखेरचा श्वास घेतला आहे. या खेळाडूच्या आईने या संदर्भातली माहिती सोशल मीडियावर दिली आहे. या घटनेने क्रीडा विश्वात शोककळा परसली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माजी वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट (WWE) कुस्तीपटू सारा ली (sara lee death) हीचे निधन झाले आहे. वयाच्या 30 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतलाय.साराच्या (sara lee passes away) मृत्यूची बातमी तिच्या आईने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. यानंतर चाहतांना मोठा धक्का बसला आहे. सारा लीचा (sara lee) मृत्यू कसा झाला, हे अद्याप समजू शकले नाही आहे. 



दरम्यान सारा लीच्या (sara lee death) मृत्यूची बातमी समजल्यानंतर WWE व्यतिरिक्त अलेक्सा ब्लिस, बेकी लिंच, मिक फॉली यांसारख्या अनेक स्टार्सनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे.


2016 ला शेवटचा सामना खेळला
सारा लीने (sara lee death) जवळपास एक वर्ष WWE मध्ये फाईट केली आहे. 2016 मध्ये एका लाइव्ह कार्यक्रमादरम्यान ती हील्सचा प्रोमो देताना दिसली होती. काही दिवसांनंतर, जानेवारीमध्ये, सारा लीने (sara lee passes away) सहा महिलांच्या टॅग टीमच्या सामन्यातून रिंगमध्ये पदार्पण केले होते. सारा ली WWE च्या रिअॅलिटी सीरिज टफ इनफच्या सीझन 6 ची विजेती देखील आहे. 2016 च्या शेवटी, साराने तिचा शेवटचा सामना खेळला. त्याच काळात ऑगस्टमध्ये सारा लीने दुहेरीचा सामना खेळला होता. 



सोशल मीडिया सेन्सेशन
सारा ली (sara lee death) ही एक मजबूत कुस्तीपटू सोबत खुप ग्लॅमरस सुद्घा होती. त्यामुळेच ती सोशल मीडिया सेन्सेशन देखील होती. तिचे फोटो आणि व्हिडिओ सातत्याने व्हायरल व्हायचे. तिने तिच्या इंस्टाग्रामच्या बायोमध्ये माजी NXT/WWE सुपरस्टार लिहिले आहे, यासह रिअॅलिटी मालिका टफ इनफ सीझन 6 ची विजेती असल्याचाही उल्लेख केला आहे. 


सारा लीने (sara lee death) पाच वर्षांपूर्वी माजी WWE सुपरस्टार वेस्ली ब्लेकसोबत लग्न केले होते. सारा लीने 30 डिसेंबर 2017 रोजी लग्न केले होते.


दरम्यान सारा लीच्या  (sara lee passes away) निधनानंतर क्रीडा विश्वात शोककळा पसरली आहे. तसेच तिला क्रीडा विश्वातून श्रद्धांजली व्यक्त करण्यात येत आहे.