मुंबई : भारताचा माजी खेळाडू आणि क्रिकटचा देवता सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकर नेहमीच चर्चेत असते. साराने आपल्या सौंदर्याने बॉलिवूडमधील अभिनेत्रींना देखील मागे टाकलं आहे. सारा नुकतीच मॉडलिंगमध्ये उतरली होती. तिचे मॉडलिंगचे फोटो भलतेच व्हायरल झाले आहेत. लोकांना साराची शैली फारच आवडते. ज्यामुळे सारासंदर्भात कोणतीही बातमी किंवा माहिती जाणून घेण्यासाठी चाहाते कधीही मागे हटत नाहीत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी सारा तेंडुलकर तिच्या बॉयफ्रेंडमुळे चर्चेत आली होती. परंतु आता सारा आणखी एका गोष्टीसाठी चर्चेत आली आहे. ती म्हणजे बॉलिवूडमध्ये डेब्यु करण्याची....


सारा ही सर्वात लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक मानली जाते. लूक आणि स्टाइलसह साराचे आकर्षक व्यक्तिमत्त्व चाहत्यांना खूप आवडते. ज्यामुळे सारा कधी बॉलिवूडमध्ये डेब्यु करतेय, याकडेच सर्वांच लक्ष आहे.


सारा खरंच बॉलिबूडमध्ये येणार का? याबद्दल जाणून घेऊ


ताज्या माहितीनुसार, साराला बॉलिवूडमध्ये करिअर करायचे आहे आणि तिला चित्रपटांमध्ये खूप रस आहे.


बॉलीवूड लाइफमधील सूत्रांच्या हवाल्याने प्रसिद्ध झालेल्या बातमीत असे सांगण्यात आले आहे - सारा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकते. तिला अभिनयात खूप रस आहे आणि तिने अभिनयाचे धडेही घेतले आहेत.


साराने लंडन विद्यापीठातून वैद्यकीयशास्त्रात शिक्षण घेतले आहे. मात्र, तिला ग्लॅमरच्या दुनियेत करिअर करायचे आहे.


सुत्रांनी Sara Tendulkar बद्दल काय सांगितले?


सारा तिच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांना आश्चर्यचकित करू शकते. ती खूप हुशार आहे आणि तिचे पालक तिला प्रत्येक निर्णयात खूप साथ देत आहेत. सारा व्यवसायाने मॉडेल आहे. तिचे फोटो अनेक चाहत्यांना वेड लावत आहेत.


काही काळापूर्वी सारा शाहिद कपूरसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, सचिनने आपली मुलगी सध्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करत असल्याचे सांगत या वृत्तांचे खंडन केले होते.


आता पुन्हा एकदा साराच्या बॉलिवूड डेब्यूची बातमी जोर धरत आहे. त्यामुळे यावेळी तरी सारा बॉलिवूडमध्ये प्रवेश करते की, नाही हे पाहणे औत्सुक्याचं ठरेल.