Sara Tendulkar Reactions Video : वानखेडेच्या मैदानावर भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना खेळवला जात आहे. या सामन्यात किंग विराट कोहली (Virat kohli) आणि प्रिन्स शुभमन गिल (Shubman gill) यांची शतकं हुकली. शतकाच्या जवळ जाऊन दोन्ही खेळाडू बाद झाल्याने चाहत्यांचा हिरमोड झालाय. युवा शुभमन गिलने आपल्या दिमाखदार कामगिरीने टीम इंडियाच्या धावसंख्येत मोठी वाढ केली. शुभमन गिलने मागून येऊन वादळी खेळी करत विराटचा प्रेशर कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दिलशान मदुशंका याने विकेट घेऊन टीम इंडियाला धक्का दिला. शुभमनच्या विकेटवेळी मैदानात उपस्थित असलेल्या सारा तेंडूलकरचा (Sara Tendulkar) चेहरा देखील पडला होता. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यात झालेल्या सामन्यात सारा तेंडूलकरने हजेरी लावली होती. त्यानंतर आता होम ग्राऊंडमध्ये देखील सारा उपस्थित असल्याचं पहायला मिळालं. शुभमन गिल त्याच्या नात्यामुळे चर्चेत असतो. अनेकदा शुभमन गिलचे नाव सारा तेंडुलकरसोबत जोडलं जातं. दोघंही एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होत असते. अशातच आता साराच्या मैदानातील उपस्थितीमुळे अनेकांननी भूवया उंचावल्या आहेत. शुभमन बाद झाल्यानंतर साराला देखील धक्का बसला. साराचा चेहरा उतरला. मात्र, त्याच्या 92 धावांच्या खेळीचं साराने टाळ्या वाजवून स्वागत केलं. त्याचा व्हिडीओ (Sara Tendulkar Reactions Video) सध्या समोर आलाय.


पाहा Video



रोहित शर्मा बाद झाल्यानंतर शुभमन गिल आणि विराट कोहली सुरुवातीला थोडे चाचपडत खेळत होते. त्याचवेळी लंकेच्या फिल्डर्सने जीवदान दिले. गिल आणि विराट कोहली यांचे सोपे झेल लंकेच्या फिल्डर्सनी सोडले. त्यानंतर  शुभमन गिलने 92 चेंडूत 92 धावा केल्या. या खेळीत त्याने 11 फोर आणि 2 सिक्स खेचले. विराट कोहलीसह शुभमन गिलने दुसऱ्या विकेटसाठी 189 धावांची भागीदारी केली.


IND vs SL : कोहलीच्या शतकासाठी देव पाण्यात पण विराट मदुशंकाच्या ट्रॅपमध्ये अडकला; पाहा नेमकं काय झालं?


भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (W), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.


श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (W/C), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, दुशान हेमंथा, महेश थेक्षाना, कसून रजिथा, दुष्मंथा चमीरा, दिलशान मदुशंका.