Sara Tendulkar : सध्या टीम इंडियाचा हँडसम हंक शुभमन गिल ( Shubman Gill ) उत्तम फॉर्ममध्ये दिसून येतोय. सोमवारी सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात गुजरातचा ओपनर शुभमन गिल ( Shubman Gill ) ने तुफानी खेळी केली. हैदराबादविरूद्धच्या सामन्यात गिलने शतक झळकावलं. दरम्यान यानंतर सोशल मीडियावर असा दावा करण्यात येतोय की, सारा तेंडुलकरने ( Sara Tendulkar ) शुभमनचा फोटो इन्स्टाग्रामच्या स्टोरीवर शेअर केला आहे. 


सोशल मीडियावर व्हायरल होतोय फोटो


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतोय. या फोटोमध्ये सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरने ( Sara Tendulkar ) तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शुभमन गिलचा फोटो शेअर केलाय. यावेळी तिने हार्टचे इमोजी पोस्ट केल्याचंही दिसतंय. मात्र हे खरंच असं प्रकरण आहे का, याबाबत जाणून घेऊया. 


शुभमन गिलचं कौतुक


गेल्या काही दिवसांपासून शुभमन गिल उत्तम फॉर्ममध्ये दिसतोय. हैदराबादविरूद्धच्या सामन्यात शुभमनने 58 बॉल्समध्ये 101 रन्सची खेळी केली. यावेळी अनेक दिग्गजांनी शुभमनच्या ( Shubman Gill ) या खेळीचं कौतुक केलं. शुभमनच्या या खेळीमुळे गुजरातला हैदराबादवर विजय मिळवणं शक्य झालं.


साराने पोस्ट केला शुभमनचा फोटो?


दरम्यान सोशल मीडियावरून अशा दावा करण्यात येतोय  की, सारा तेंडुलकरने ( Sara Tendulkar ) तिच्या इन्स्टाग्रामच्या स्टोरीवर शुभमनचा ( Shubman Gill ) शतक झळकावल्यानंतरचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोसोबत तिने हार्ट इमोजीस देखील जोडलेत. हा फोटो प्रचंड व्हायरल होत असून त्यांच्या अफेअरची चर्चा रंगतेय. 


एडिटेड फोटो होतोय व्हायरल


पडताळणी केल्यानंतर हा एडिटेड फोटो असल्याचं लक्षात आलंय. याचाच अर्थ साराने ( Sara Tendulkar ) तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून शुभमनचा ( Shubman Gill ) कोणताही फोटो शेअर केलेला नाही. हा फोटो एडिटेड असून वरील बाजूल केवळ साराच्या इन्स्टाग्राम हँडलचं नाव कॉपी करण्यात आलंय. 



गुजरातचा हैदराबादवर विजय


सोमवारी झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांना शुभमन गिलने ( Shubman Gill ) चांगलंच चोपलं. यावेळी शुभमन गिलने 58 बॉल्समध्ये 101 रन्स ठोकले. गिलने त्याच्या या खेळीत 1 सिक्स आणि 13 फोर लगावले. तर या सामन्यात त्याने 174.14 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. या सामन्यात गिलला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देखील देण्यात आलाय.