Sara Tendulkar : लंडनमध्ये एका मुलासोबत स्पॉट झाली सारा; सचिनच्या मुलीसोबत असलेला हा मिस्ट्री बॉय कोण?
Sara Tendulkar : साराचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये सारासोबत एक मुलगा दिसतोय. दरम्यान आता चाहते हा मिस्ट्री बॉय कोण हा प्रश्न उपस्थित करतायत.
Sara Tendulkar : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरची ( Sachin Tendulkar ) मुलगी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी अर्जुनसाठी ( Arjun Tendulkar ) स्टेडियममध्ये उपस्थिती लावते तर कधी शुभमन गिलशी ( Shubman Gill ) साराचं नाव जोडण्यात येतं. अशातच आता साराचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये रूममध्ये सारा एका मुलासोबत दिसतेय. दरम्यान हा मुलगा नेमका कोण आहे, यावर आता प्रश्न उपस्थित होतंय.
सारा तेंडुलकरचा ( Sara Tendulkar ) हा फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. आता सोशल मीडियावर चाहते वारंवार एकच प्रश्न विचारतायत. हा व्यक्ती कोण आहे जिच्यासोबत सारा तेंडुलकर ( Sara Tendulkar ) बंद खोलीत आहे, असा सवाल केला जातोय.
सारासोबत असलेला हा मिस्ट्री बॉय कोण?
सारा तेंडुलकरचा ( Sara Tendulkar ) सोशल मीडियावर मुलासोबतचा एक फोटो व्हायरल होतोय. सारा तेंडुलकरसोबत असलेल्या या मिस्ट्री बॉयचं नाव शोभित गोपाकुमार असं आहे. सारा तेंडुलकर आणि शोभित गोपाकुमार हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत.
शोभित आणि सारा एकमेकांसोबत व्हिडीओ बनवत असतात. नुकतंच दोघांनी एक व्हिडीओ बनवला असून त्यावेळचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
शुभमनपाठोपाठ साराही लंडनमध्ये
टीम इंडिया सध्या इंग्लंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना खेळतेय. शुभमन गिल देखील या टेस्ट टीमचा भाग आहे. दरम्यान सामन्यापूर्वी यावेळी सूर्यकुमारने शुभमन गिलसोबत ( Shubman Gill ) एक फोटो पोस्ट केला होता. हा फोटो शेअर करताना सूर्याने 'लंडन' हे लोकेशन पिन केलेलं. त्यानंतर साराने देखील तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केलाय. ज्यामध्ये ती बसली असून आजबाजूच्या नजाऱ्याचा आनंद घेतेय. दरम्यान साराचा हा फोटो देखील लंडनचा असल्याचं समोर आलं.
सारा आणि शुभमनच्या अफेअरची चर्चा
शुभमन आणि सारा तेंडुलकर यांचं नाव एकमेकांशी जोडलं आहे. सध्या टीम इंडियाचा स्टार फलंदाज शुभमन गिल ( Shubman Gill ) उत्तम फॉर्ममध्ये आहे. गेल्या काही महिन्यांपासून सचिन तेंडुलकरची मुलगी सारा ( Sara Tendulkar )आणि शुभमन गिलच्या अफेअरची चर्चा सोशल मीडियावर रंगते. मात्र दोघांकडून अजूनही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नाहीये.