Sara Tendulkar : आयपीएल 2023 ( IPL 2023 ) च्या साखळी फेरीमधील अंतिम सामन्यामध्ये गुजरात टायटन्सने ( Gujarat Titans ) रॉयल चॅलेंजर बंगळूरूचा ( Royal Challengers Bangalore ) पराभव तर केलाच सोबत आरसीबीला आयपीएलमधून बाहेरचा रस्ता देखील दाखवला. दरम्यान गुजरातच्या या विजयामध्ये शुभमन गिलचा ( Shubman Gill ) मोठा वाटा होता. दुसरीकडे गुजरातच्या या विजयामुळे मोठा फायदा झाला तो म्हणजे, मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians ) टीमचा. आरसीबीच्या पराभवामुळे मुंबईला प्लेऑफमध्ये स्थान गाठता आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरातच्या विजयानंतर मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians ) चाहत्यांनी शुभमन गिलला धन्यवाद दिले. अशातच सारा तेंडुलकरच्या ( Sara Tendulkar ) एक ट्विटने सर्वांचं लक्ष्य वेधून घेतलं आहे. या ट्विटमध्ये साराने शुभमनला ( Shubman Gill ) धन्यवाद म्हटल्याचं दिसून येतंय. असा दावा करण्यात येतोय की, हे ट्विट साराने केलं आहे. शुभमनला धन्यवाद दिल्याचं हे ट्विट सोशल मीडियावर ( Social Media ) चांगलंच व्हायरल होताना दिसतंय. 


साराने खरंच मानले शुभमनचे आभार?


रॉयल चॅलेंजर बंगळूरू विरूद्धच्या सामन्यात शुभमन गिलने शतकी खेळी केली. त्याच्या या शतकी खेळीमुळे गुजरात टायटन्सचा विजय तर झालाच सोबत मुंबईला देखील प्लेऑफमध्ये जागा मिळाली. दरम्यान यानंतर ट्विटरवर सारा तेंडुलकर ( Sara Tendulkar ) नावाच्या एका अकाऊंटने, मुंबईकडून शुभमन ( Shubman Gill ) तुला धन्यवाद, असं म्हटलं. यानंतर चाहत्यांनी साराने शुभमनला धन्यवाद दिल्याचं म्हटलं आहे. 


दरम्यान हे अकाऊंट सारा तेंडुलकरचं ( Sara Tendulkar ) अधिकृत नाहीये. एका चाहत्याने साराच्या नावाने हे अकाऊंट ओपन केलं असून त्याच्यावरून हे ट्विट करण्यात आलंय. हे ट्विट सध्या साराच्या नावाने प्रचंड व्हायरल होतंय. 



सचिननेही केलं शुभमनचं कौतुक


गुजरात टायटन्स विरूद्ध रॉयल चॅलेंजर बंगळूरू यांच्यातील सामन्यानंतर शुभमन गिलवर ( Shubman Gill ) कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. यावेळी सचिननेही शुभमनचं ट्विट करून कौतुक केलं आहे. या ट्विटमध्ये सचिनने म्हटलंय की, कॅमरुन ग्रीन आणि शुभमन गिलने मुंबई इंडियन्ससाठी खूप उत्तम बॅटिंग केली. या वाक्यासोहत सचिनने एक हसण्याचा इमोजीही वापरला होता.


सारा आणि शुभमनच्या अफेअरची चर्चा


गेल्या अनेक दिवसांपासून सारा तेंडुलकर ( Sara Tendulkar ) आणि शुभमन गिल एकमेकांना डेट करत असल्याचं समोर आलं होतं. शुभमनचं नाव अनेकदा सारा तेंडुलकरसोबत जोडलं जातं. सोशल मीडियावर सारा आणि शुभमन या दोघांचं अफेअर असल्याची कथित चर्चा आहे. दरम्यान अजून याची अधिकृतरित्या कोणीही घोषणा केली नाही.