नवी दिल्ली : पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद याची आज हकालपट्टी करण्यात आली आहे. टेस्ट आणि टी-20 चा कर्णधार असलेल्या सरफराजला पाकिस्तानी क्रिकेट संघाने कर्णधारपदावरुन ड़च्चू दिली आहे. सरफराजच्या ऐवजी आता अजहर अलीला पाकिस्तान संघाच्या टेस्ट फॉरमॅटचा कर्णधार तर बाबर आझमची टी-20 चा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सिरीजमध्ये घरच्याच मैदानात पराभव झाल्याने पाकिस्तानी चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. या पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदवर जोरदार टीका झाली. पाकिस्तानी टीमचा मुख्य प्रशिक्षक मिसबाह उल हकने देखील कर्णधार सरफराजच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली होती. मिसबाहने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे सीईओ वसीम खान यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतरच सरफराजकडून कर्णधारपद काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.



पाकिस्तान संघ आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियामध्ये ३ नोव्हेंबरपासून टी-२० सीरिजला सुरुवात होणार आहे.


सरफराज टीमचा कर्णधार राहू शकत नाही, असं मिसबाहने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला सांगितलं होतं. पण याबाबत बोर्ड संभ्रमात होता. पण अखेर त्याची या पदावरुन हकालपट्टी करण्याचा निर्णय़ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आज घेतला.