Rohit Sharma: रोहित शर्मा आणि त्याची विसरण्याची सवय आता जवळपास सर्वांना माहिती झालीये. अगदी पासपोर्टपासून ते साखरपुड्याच्या अंगठीपर्यंत आजवर रोहित शर्मा त्याच्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी विसरला आहे. अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये रोहित शर्मा स्वतःचा फोन विसरल्याचं दिसून येतंय. 


सचिन तेंडुलकरने घेतली रोहित शर्माची फिरकी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वास्तविक, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकर सध्याच्या खेळाडूंबद्दल बोलताना दिसतायत. ही एक जाहिरात असून धोनी देखील या जाहिरातीत आहे. यावेळी सचिन तेंडुलकर रोहित शर्माचा फोन घेऊन येतो. हा फोन रोहित टीम बसमध्ये विसरून आलेला असतो. ही रोहित शर्मासोबत एक सामान्य घटना मानली जाते. 


व्हिडिओमध्ये सचिन तेंडुलकरची एंट्री एका नवीन फोनसोबत होताना दिसतोय. यावेळी धोनी आणि रोहित सचिनला, व्वा पाजी नवीन फोन, असं म्हणत स्तुती करतात. यानंतर रोहित म्हणतो, पाजी, तुमचा फोन अगदी माझ्यासारखा आहे. यावेळी सचिन रोहितला सांगतो की, तो फक्त तुझाच फोन आहे, तो बसमध्येच विसरला होता. दरम्यान जाहिरातीत देखील रोहित शर्माच्या या विसरण्याच्या सवयीचा वापर केलेला दिसून येतोय.



टॉसदरम्यान खेळाडूंचं नाव विसरला रोहित


सध्या कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये टॉस झाल्यानंतर कमेंट्रिटर मुरली कार्तिकने रोहित शर्माला विचारलं की, प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणत्या खेळाडूंचा समावेश केला गेलेला नाही. पण यावेळी तो खेळाडूंची नावंच विसरून गेल्याचं दिसून आलं. इतकंच नव्हे तर भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामन्यादरम्यान देखील टॉस झाल्यानंतर फलंदाजी घ्यायची की गोलंदाजी हे देखील रोहित शर्मा विसरला होता.


विराट कोहलीनेही सांगितली रोहितची ही सवय


रोहित शर्माच्या या सवयीबद्दल कोहलीने देखील विधान केलं होतं. यावेळी कोहलीने सांगितलं होतं की, रोहित अनेकदा हॉटेलमध्ये आपला आयपॅड, मोबाईल आणि पासपोर्टही विसरतो. इतकंच नाही तर एकदा तो त्याच्या लग्नाची अंगठी हॉटेलमध्ये विसरला होता. एशिया कपची ( Asia cup 2023 ) फायनल संपल्यानंतर रोहित हॉटेलमध्ये पासपोर्ट विसरल्याचंही समोर आलं होतं.