मुंबई : भारतीय क्रिकेट टीम आणि कर्णधार विराट कोहलीला कृषी वैज्ञानिकांनी एक अनोखा सल्ला दिला आहे. मध्य प्रदेशच्या झाबुआमध्ये आढळणारा कडकनाथ जातीचा कोंबडा आपल्या डाएटमध्ये सहभागी करण्याचा सल्ला वैज्ञानिकांनी दिला आहे. कारण कडकनाथ चिकनमध्ये कॉलेस्ट्रोल आणि फॅट्स कमी असतात. कृषी विज्ञान केंद्राने बोर्ड ऑफ क्रिकेट कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडियाला पत्र लिहलं आहे. ज्यामध्ये कडकनाथ चिकन खाण्याचा उल्लेख करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कृषी विज्ञान केंद्राने लिहिलं आहे की, मीडियाच्या माध्यमातून कळालं की, विराट कोहली आणि टीमच्या बाकी खेळाडूंना डाएटमध्ये ग्रील्ड चिकन दिलं जातं. पण या चिकनमध्ये कॉलेस्ट्रोल आणि फॅट मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे हे खाणं बंद करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. त्याऐवजी कडकनाथ चिकन खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि आयरन असतात.



कर्णधार विराट कोहली आपल्या डाएटच्या बाबतीत खूप काळजी घेतो. त्याने काही दिवसांपूर्वीच म्हटलं होतं की, त्याने नॉनव्हेज खाणं बंद केलं आहे. 


मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या अनेक आदिवासी भागांमधून कडकनाथ कोंबडा हा पुरवला जातो. या कोंबड्याचं चिकन ४०० ते ५०० रुपये प्रति किलो आहे. सामान्यपणे बॉयलर, कॉकरेल आणि अन्य चिकन दीडशे ते २०० रुपये प्रति किलोने मिळतं. कडकनाथ हा एक जंगली कोंबडा आहे. हा पूर्णपणे निसर्गात राहत असल्याने तो फार आक्रमक आणि भारी असतो.