Nepal vs Scotland Sandeep Lamichhane : क्रिकेटच्या मैदानात खेळाडूंमध्ये स्लेजिंग, वादविवाद होत असतात.हे वाद होऊन सुद्धा सामन्या संपल्यानंतर दोन्हीही खेळाडू एकमेकांना शेकहॅड करून खेळभावनाचा आदर करतात. मात्र या घटनेत काही वेगळाच प्रकार घडलाय. एका खेळाडूचा प्रतिस्पर्धी संघाशी मैदानात कोणताही वाद झाला नाही, याउलट त्याने संघासाठी उत्कृष्ट कामगिरी देखील केली. मात्र तरीही खेळाडूला (Sandeep Lamichhane) प्रतिस्पर्धी संघाकडून अपमानजनक वागणूक देण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.या व्हिडिओची क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे. (scotland players refused to shake hands with nepal leg spinner sandeep lamichhane video viral)


प्रकरण काय? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेपाळ आणि स्कॉटलंड (Nepal vs Scotland)यांच्यातील सामन्या दरम्यान ही घटना घडली. या सामन्यात नेपालचा लेगस्पिनर संदीप लामिछानेचा (Sandeep Lamichhane) अपमान झाला आहे. स्कॉटलंडच्या खेळाडूंनी संदीप लामिछानेशी शेकहॅडच केले नाही. याउलट नेपाळच्या इतर खेळाडूंशी शेकहॅड केले आणि संदीपशी शेकहॅड करणे टाळले. या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. 


बलात्काराचा आरोप?


दरम्यान संदीप लामिछाने (Sandeep Lamichhane) याच्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. नुकताच त्याला कोर्टातून जामीन मिळाला होता, त्यानंतर त्याचा नेपाळ क्रिकेट संघात पुन्हा समावेश करण्यात आला होता. तसेच संदीप लामिछानेवर गेल्या वर्षी 8 सप्टेंबर रोजी बंदी घालण्यात आली होती. या खेळाडूला ऑक्टोबरमध्ये अटकही झाली होती. लामिछाने जवळपास 3 महिने तुरुंगात राहिला आणि 12 जानेवारीला या खेळाडूला जामीन मिळाला होता.यानंतर लामिछानेचा नेपाळ क्रिकेट संघात समावेश करण्यात आला. 


स्कॉटलंड संघाआधी नामिबियाच्या खेळाडूंनीही संदीप लामिछानेशी (Sandeep Lamichhane) शेकहॅड केले नाही. लामिछानेचे नेपाळ संघात पुनरागमन झाल्याने नामिबिया आणि स्कॉटलंडचे खेळाडू खूश नाहीत. विशेष म्हणजे लामिछाने यांच्यावर आजही बलात्काराचा आरोप आहे. त्याच्यावर खटला सुरू आहे आणि त्यामुळेच प्रतिस्पर्धी संघ त्याच्याशी शेकहॅंड करत नाहीत. 



प्रतिस्पर्धी संघ लामिछानेवर (Sandeep Lamichhane)नाराज असला तरी त्याने मैदानात संघासाठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.लामिछानेने शुक्रवारच्या सामन्यात 10 ओव्हरमध्ये 27 धावा देत 3 विकेट घेतले. स्कॉटलंडने प्रथम फलंदाजी करताना 274 धावा केल्या होत्या मात्र कुशल मल्ला आणि दीपेंद्र सिंग अरीच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर नेपाळने सामना जिंकला. लामिछानेने नामिबियाविरुद्धही 3 विकेट घेतल्या.त्या सामन्यातही नेपाळने (Nepal) विजय मिळवला होता.