नवी दिल्ली : राजकोटमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यानंतर भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर जोरदार टीका केली जातेय. सोशल मीडियावरही या सामन्यातील पराभवाचे संपूर्ण खापर धोनीवर फोडलं गेलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतकंच नव्हे तर सामन्यानंतर माजी क्रिकेटर व्हीव्हीएस लक्ष्मण आणि अजित आगरकरनेही धोनीने टी-२०मधून निवृत्ती घ्यावी असा सल्लाही दिला. धोनीला निवृत्ती घेण्याचा सल्ला देणाऱ्यांना माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने चांगलेच फैलावर घेतलेय. धोनीच्या अपयशाबाबत सेहवागने टीम मॅनेजमेंटवर नाराजी व्यक्त केलीये. सेहवागने हार्दिक पांड्यावर निशाणा साधलाय.


सेहवागने एका न्यूज चॅनेलला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणाला, धोनीला संघात आपली भूमिका समजून घ्यावी लागेल. मोठ्या धावसंख्येचा पाटलाग करताना वेगाने धावा कराव्या लागतील. टीम मॅनेजमेंटला याबाबत सांगावे लागेल. तसेच विराटच्या नेतृत्वाखालील संघाला धोनीची गरज असल्याचेही सेहवाग म्हणाला. 


भारतीय संघासाठी प्रत्येक वेळेला धोनीची गरज आहे. टी-२०क्रिकेटमध्येही आहे. तो योग्य वेळ आल्यानंतर निवृत्ती घेईल आणि कोणत्याही युवा क्रिकेटर्सना संधी देईल. 


यासोबतच त्याने टीम मॅनेजमेंटवरही नाराजी व्यक्त केली. अखेर काय विचार करुन धोनीला पांड्यानंतर फलंदाजीला पाठवण्यात येते. पांड्याला सहाव्या की सातव्या क्रमांकावर खेळवावे हे संघाला निश्चित करावे लागेल. 


सेहवागने यावेळी पांड्यावरही निशाणा साधला. पांड्याने गेल्या सहा टी-२० सामन्यात ९.६९च्या रनरेटने ४८ धावा केल्या. या सगळ्या सामन्यांमध्ये पांड्याला मध्यम फळीच्या आधी पाठवण्यात आले. त्यामुळे पांड्याला वरच्या क्रमांकावर फलंदाजीस का पाठवले जातेय असा सवाल सेहवागने मॅनेजमेंटला केलाय.