धोनीच्या भविष्याचा निर्णय निवड समितीवर सोपवावा - कपिल देव
भारताचा माजी क्रिकेटरने कपिल देवने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची पाठराखण केलीये. धोनीच्या भविष्याचा निर्णय निवड समितीवर सोपवावा असे कपिल देव यांनी म्हटलंय.
हैदराबाद : भारताचा माजी क्रिकेटरने कपिल देवने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची पाठराखण केलीये. धोनीच्या भविष्याचा निर्णय निवड समितीवर सोपवावा असे कपिल देव यांनी म्हटलंय.
असं कोणीही नाही जो आयुष्यभर खेळत राहील. मात्र मला वाटते धोनी सध्या चांगला खेळतोय. त्यामुळे त्याच्याबाबतचा निर्णय निवड समितीवरच सोपवावा. ते याबाबतचा योग्य निर्णय घेतील, असे कपिल देव म्हणाले.
कपिल पुढे म्हणाले, मी माझे मत दिले तर लोकांच्या मनात संशय निर्माण होईल. मला तसे करायचे नाहीये. त्यामुळे हा निर्णय निवड समितीवरच सोपवावा. त्याने कधी खेळावे कधी नाही हा निर्णय त्यांच्यावरच सोपवावा, असे कपिल देव यांनी सांगितले. याआधी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही धोनीची पाठराखण केली होती.
शास्त्री म्हणाले, धोनीविरोधात बोलण्याआधी लोकांनी आपलं करिअरकडे पाहावं. धोनीला अद्याप खूप क्रिकेट खेळायचे आहे आणि संघाचीही ती जबाबदारी आहे की त्यांनी अशा खेळाडूला सपोर्ट करावा. विकेटच्या मागे आणि फलंदाजीतील त्याची योग्यता पाहता धोनीपेक्षा दुसरा कोणी चांगला ऑप्शन असूच शकत नाही.