टीम इंडियाला सापडली विराटची Replacement ? मोठ्या निर्णयावर सर्वांच्या नजरा
भारतीय फलंदाज, माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या खराब फॉर्मचा सामना करत आहे. त्यामुळे क्रिकेट वर्तुळासह मीडियातून विराटच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. त्यात या वर्षाच्या शेवटी टी20 वर्ल्ड कपही होणार आहे. त्यापूर्वी सिलेक्टर्सची टीम विराटशी चर्चा करणार आहे. या चर्चेतून काही निष्पन्न न झाल्यास विराटला (Virat Kohli)टीममधून डच्चू देण्याची तयारी सूरू असल्याची चर्चा आहे.
मुंबई : भारतीय फलंदाज, माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या खराब फॉर्मचा सामना करत आहे. त्यामुळे क्रिकेट वर्तुळासह मीडियातून विराटच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. त्यात या वर्षाच्या शेवटी टी20 वर्ल्ड कपही होणार आहे. त्यापूर्वी सिलेक्टर्सची टीम विराटशी चर्चा करणार आहे. या चर्चेतून काही निष्पन्न न झाल्यास विराटला (Virat Kohli)टीममधून डच्चू देण्याची तयारी सूरू असल्याची चर्चा आहे.
विराट कोहली (Virat Kohli) गेल्या अनेक वर्षापासून खराब फॉर्ममुळे कारकिर्दीत संघर्ष करताना दिसत आहे. यंदाच्या आयपीएलमध्येही (IPL 2022) तो खास अशी कामगिरी करू शकला नाही. 12 सामन्यात 19 च्या सरासरीच्या तुलनेत त्याने 216 रन्स केले आहेत. तर, गेल्या काही वर्षापासून विराट एकही शतक झळकावू शकला नाही आहे. त्यामुळे त्याच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
भारतीय क्रिकेट संघातील माजी खेळाडू देखील विराटवर टीका करत आहेत. ज्यामुळे सिलेक्टर्स विराटचा सोक्षमोक्ष लावण्याचे संकेत आहेत.
यंदाच्या वर्षअखेरीस ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी-20 वर्ल्ड कप होणार आहे. त्यात भारताने दीर्घकाळापासून एकही आयसीसी ट्रॉफी जिंकली नाही. त्यामुळे बीसीसीआयचे डोळे या ट्रॉफीवर लागले आहेत. या ट्रॉफीवर भारताचे नाव कोरण्यासाठी सिलेक्शन कमिटी एक तगडी टीम मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे.
भारतीय संघात सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन असे नवखे खेळाडू आहेत. त्याचबरोबर इतरही अनेक खेळाडू संघात एंन्ट्रीसाठी वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत कोहलीचा खराब फॉर्म कायम राहिला तर तो संघातून वगळल्यास आश्चर्य वाटू नये, असे जाणकारांचे म्हणणे आहे.