भारत वि द. आफ्रिका : भारत सेमीफायनलमध्ये पोहोचणार?
भारत वि दक्षिण आफ्रिका यांच्यात उद्या सामना होतोय. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील अ गटात इंग्लंड संघाने सेमीफायनल गाठलीये तर दुसरा संघ आज निश्चित होईल. ब गटात भारत, द. आफ्रिका, श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन्ही संघाने दोन दोन सामने खेळलेत आणि त्यातील एक सामना जिंकलाय.
लंडन : भारत वि दक्षिण आफ्रिका यांच्यात उद्या सामना होतोय. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील अ गटात इंग्लंड संघाने सेमीफायनल गाठलीये तर दुसरा संघ आज निश्चित होईल. ब गटात भारत, द. आफ्रिका, श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन्ही संघाने दोन दोन सामने खेळलेत आणि त्यातील एक सामना जिंकलाय.
पहिली स्थिती - भारताने द. आफ्रिकेला हरवल्यास
सेमीफायनलमध्ये ब गटातील कोणते संघ खेळणार आहेत याबाबत अद्याप निश्चित झालेले नाहीये. त्यामुळे उद्या होणाऱ्या सामन्यात भारताने द. आफ्रिकेला हरवल्यास ते ४ गुणांसह सेमीफायनलमध्ये पोहोचतील. तर द. आफ्रिका स्पर्धेतून बाद होईल. त्यानंतर श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील विजेता संघ सेमीफायनलमध्ये पोहोचेल.
दुसरी स्थिती - सामन्यात पाऊस झाल्यास
ब गटातील सामन्यादरम्यान पाऊस झाल्यास भारताला सेमीफायनलमध्ये जाण्याची संधी आहे. पावसामुळे सामना रद्द झाल्यास दोन्ही संघाचे गुण ३-३ होतील. यावेळी रनरेटच्या आधारे निर्णय होईल आणि रनरेटमध्ये भारत अव्वल स्थानी आहे त्यामुळे भारत सेमीफायनलमध्ये पोहोचेल.
तिसरी स्थिती - भारत सेमीफायनलमध्ये पोहोचेल...मात्र पाकिस्तान स्पर्धेतून बाद
ब गटातील दोन्ही सामन्यात पावसाचा व्यत्यय राहिल्यास रनरेटच्या आधारे सेमीफायनलसाठी संघ निश्चित केले जातील. रनरेटनुसार भारत पहिल्या स्थानी आहे. त्यानंतर अनुक्रमे द. आफ्रिका, श्रीलंका आणि पाकिस्तानचा नंबर लागतो.