लंडन : आघाडीची महिला टेनिसपटू अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने पुढील महिन्यात होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकमधून माघार घेतली आहे. विम्बल्डनच्या पत्रकार परिषदेत बोलताना सेरेनाने ऑलिम्पिकमध्ये न खेळण्याचा निर्णय जाहीर केला, पण यामागचं कारण मात्र तीने सांगितलं नाही.


सेरेनाने मागितली माफी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेरेनाने सांगितलं, ऑलिम्पिकसाठी जाणाऱ्या खेळाडूंच्या यादीत माझं नाव नाही. ऑलिम्पिकमध्ये सहभागी न होण्यामागे अनेक कारणे आहेत. वास्तविक मला या स्पर्धेत सहभागीच व्हायचे नाही. त्याबद्दल मी सर्वांची माफी मागते.


ऑलिम्पिकमध्ये 4 सुवर्णपदकं


39 वर्षीय सेरेनाने अमेरिकेसाठी ऑलिम्पिकमध्ये चार सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. 2012 मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये तिने एकेरी आणि दुहेरी दोन्ही प्रकारात सुवर्ण कामगिरी नोंदवली होती. 2000 मध्ये सिडनी आणि 2008 मध्ये बिजिंग ऑलिम्पिकमध्ये तिने दुहेरीत सुवर्ण पदक जिंकलं होतं. रिओ ऑलिम्पिक (2016) मध्ये महिला एकेरीत सेरेनाला तिसऱ्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता. तर दुहेरीत तिला व्हिनससोबतच्या दुहेरीत पहिल्याच फेरीत तिच्यावर गाशा गुंडाळण्याची वेळ आली होती. 


दिग्गज टेनिसपटूंची माघार


सेरेना विल्यम्सआधी दिग्गज टेनिसपटू राफेल नदाल आणि डोमिनिक थीम यांनी जपानमध्ये पार पडणाऱ्या ऑलिम्पिकमधून माघार घेतली आहे. तर रॉजर फेडररने ऑलिम्पिकमध्ये खेळण्याबाबत अजून निर्णय जाहीर केलेला नाही