नवी दिल्ली : आयसीसच्या दहशतवादी कारवायांमुळे उध्वस्त झालेल्या सीरिया या देशातून भारतात शिकण्यासाठी आलेला युवक अहमद हबाब याला नवी दिशा सापडलीय. भारतात भुवनेश्वरच्या कलिंग विद्यापीठात तंत्रज्ञानाचं शिक्षण घेण्यासाठी आलेल्या अहमद हबाब या २० वर्षीय तरूणाला फुटबॉलमध्ये करियर करण्याची नवी दिशा सापडलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खेलो इंडिया स्पर्धेत हबाब कलिंगा विद्यापीठाच्या टीममधून खेळतोय. विशेष म्हणजे सीरिया हा देश २०१८ च्या फिफा वर्ल्डकपसाठी क्वालिफाय झाला असता.


अशा देशातला युवक त्याचं फुटबॉल करियर भारतात येऊन घडवतोय. भारतात आल्यावर हबाबला खूपच सुरक्षित वाटतंय. अभ्यासासाठी, खेळासाठी पोषक वातावरण या देशात मिळाल्याबद्दल तो आभार व्यक्त करतो.



सीरियाविषयी बोलताना सतत हबाबच्या बोलण्यात भीतीचा उल्लेख होतो. आता कलिंगा विद्यापीठाला खेलो इंडिया स्पर्धेत अव्वल स्थानी राखण्याची त्याची जिद्द आहे.