नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीममधून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. ऑस्ट्रेलिया टेस्ट टिमचा कर्णधार टिम पेनवर गंभीर आरोप लागले आहेत. या आरोपांचा परिणाम थेट त्याच्या कर्णधारपदावर झाला आहे. टिम पेनला ऑस्ट्रेलिया टेस्ट टीमचं कर्णधारपद सोडावं लागलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टिम पेन सेक्सटिंग स्कँडलमध्ये फसला आहे. टिम पेनवर एका मुलीला अश्लिल मेसेज केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. 2017 साली टीमने एका मुलीला अश्लिल फोटो पाठवले होते. याचसोबत त्याने त्या मुलीला चुकीचे मेसेजंही केले होते. दरम्यान हे मेसेज केल्यानंतर आता टिमला एशेज सिरीजच्या अगोदरच कर्णधारपदावरून पायऊतार व्हावं लागलं आहे. 


17 नोव्हेंबर रोजी ऍशेस मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन कसोटी संघाची घोषणा करण्यात आली होती. या टिमचा कर्णधारपदाची धुरा टीम पेनच्या हातात देण्यात आली होती


मात्र आता त्याचे संघातील स्थानंही कठीण झालं आहे. टिम पेनच्या जागी वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सची ऑस्ट्रेलियन कसोटी कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.