VIDEO: पराभवानंतर शाहरुख खानने छम्मक छल्लो गाण्यावर लावले ठुमके
आंद्रे रसेल ३६ चेंडूत धमाकेदार ८८ धावांची खेळ केल्यानंतर चेन्नईविरुद्ध कोलकात्याला पराभव सहन करावा लागला. मंगळवारी एम ए चिदम्बरम स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात कोलकात्याचा ५ विकेट राखून पराभव झाला. यासोबतच दोन वर्षांनी चेन्नईने घरच्या मैदानावर विजय मिळवला.
मुंबई : आंद्रे रसेल ३६ चेंडूत धमाकेदार ८८ धावांची खेळ केल्यानंतर चेन्नईविरुद्ध कोलकात्याला पराभव सहन करावा लागला. मंगळवारी एम ए चिदम्बरम स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात कोलकात्याचा ५ विकेट राखून पराभव झाला. यासोबतच दोन वर्षांनी चेन्नईने घरच्या मैदानावर विजय मिळवला.
दिनेश कार्तिकची कोलकाता आणि धोनीच्या चेन्नई संघादरम्यानचा हा सामना रोमांचक ठरला. रसेलच्या खेळीवर सॅम बिलिंग्सची २३ चेंडूत चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने केलेली ५३ धावांची खेळी भारी पडली. बिलिंग्सव्यतिरिक्त चेन्नईसाठी शेन वॉटसनने १९ चेंडूत ४२ धावांची खेळी केली. यात ३ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे.
या सामन्यात शाहरुखच्या संघाचा पराभव झाला असला तर किंग खानने खेळाडूंचा उत्साह कायम ठेवला. मैदानावर महेंद्रसिंग धोनीची मुलगी झिवासोबत मस्ती केल्यानंतर आता शाहरुख खानचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
या व्हिडीओत शाहरुख कोलकाताच्या खेळाडूंसोबत डान्स करताना दिसतोय. हा व्हिडीओ आंद्रे रसेलने आपल्या ऑफिशियल इन्स्टाग्रामवरुन शेअर केलाय. यात शाहरुख खान, आंद्रे रसेल, शिवम मावी आणि कमलेश नागरकोटी यांनी छम्मक छल्लो या गाण्यावर डान्स केलाय.