शाहरुखची इच्छा, क्रिकेट नाही अबरामनं हा खेळ खेळावा!
बॉलीवूडचा सुपरस्टार आणि कोलकात्याच्या टीमचा मालक शाहरुख खाननं त्याचा मुलगा अबरामबद्दलची एक इच्छा बोलून दाखवली आहे.
कोलकाता : बॉलीवूडचा सुपरस्टार आणि कोलकात्याच्या टीमचा मालक शाहरुख खाननं त्याचा मुलगा अबरामबद्दलची एक इच्छा बोलून दाखवली आहे. अबरामनं मोठं झाल्यावर भारताकडून हॉकी खेळावी, असं शाहरुखला वाटतंय. २००७ साली हॉकीवर शाहरुखचा चक दे इंडिया हा चित्रपट आला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाला यशस्वी करण्यात मोलाची कामगिरी करणाऱ्या शाहरुखचं हॉकीवर असलेलं प्रेम सर्वश्रूत आहे. चक दे इंडिया हा खेळावर बनलेला सर्वोत्तम चित्रपट असल्याचं मानलं जातं. या चित्रपटामध्ये शाहरुख खाननं भारताच्या महिला हॉकी टीमचा प्रशिक्षक कबीर खानची भूमिका केली आहे.
कोलकात्याचा पहिला सामना बंगळुरुशी झाला. इडन गार्डन मैदानामध्ये शाहरुख खान अबराम आणि मुलगी सुहानासोबत आला होता. अबरामनं अजून क्रिकेट खेळायला सुरुवात केली नाही. तो फूटबॉल खेळतो. पण त्यानं भारतासाठी हॉकी खेळावी, अशी माझी इच्छा आहे, असं शाहरुख म्हणालाय.