Video: पाकिस्तानच्या शाहीन अफ्रिदीने रचला इतिहास; एकाच ओव्हरमध्ये केला `हा` कारनामा; पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्ड बनवलाय!
Shaheen Shah Afridi, T20 Blast 2023: शाहीन आफ्रिदीने एका ओव्हरमध्ये 4 विकेट घेत इतिहास रचलाय. अशी कामगिरी करणारा आफ्रिदी जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे.
Shaheen Afridi's 4 Wickets In Over: सध्या इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या व्हिटॅलिटी ब्लास्टमध्ये (Vitality T20 Blast 2023) पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) याने धमाकेदार कामगिरी करत धुरळा उडवलाय. या लीगमध्ये शाहीन आफ्रिदी आश्चर्यकारक कामगिरी करत असल्याचं दिसतंय. शाहीन आफ्रिदीने एका ओव्हरमध्ये 4 विकेट घेत इतिहास रचलाय. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 4 विकेट घेणारा आफ्रिदी जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. टी-20 ब्लास्टमध्ये नॉटिंगहॅमशायरकडून (Nottinghamshire) खेळणाऱ्या अफ्रिदीने रचलेल्या इतिहासामुळे सध्या त्याची सर्वत्र चर्चा सुरू असल्याचं दिसतंय.
अफ्रिदीच्या या भेदक गोलंदाजीमुळे त्याने सर्वांची मनं जिंकली मात्र, तरी देखील त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. संघाला पराभवाला सामोरं जावं लागल्याने शाहिन अफ्रिदीने देखील नाराजी व्यक्त केली आहे. आफ्रिदीच्या या भीमपराक्रमाचा व्हिडिओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
नेमकं काय झालं?
शाहीन अफ्रिदीने वॉर्विक शायरविरुद्धच्या पहिल्या ओव्हरचा पहिला चेंडू वाईड टाकला, ज्यावर चौकार मारला गेला. त्यानंतर अफ्रिदीने लय पकडली. दुसऱ्या चेंडूवर अफ्रिदीने अॅलेक्स डेव्हिसला इनस्विंगरने बाद केलं. पुढच्या चेंडूवर म्हणजे आफ्रिदीने ख्रिस बेंजामिनला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. आता अफ्रिदी हॅट्रिक घेणार की काय? असं सर्वांना वाटत होतं. मात्र, तो हुकला. पुढच्या तिसऱ्या आणि चौथ्या बॉलवर 1-1 धाव घेतली गेली. पाचव्या चेंडूवर डॉन मुझलला कॅच आऊट झाला. सहाव्या चेंडूवर एड बर्नार्डला बाद केलं गेलं. अशाप्रकारे अफ्रिदीने पहिल्या ओव्हरमध्ये 4 विकेट घेऊन इतिहास रचलाय.
पाहा Video
दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना नॉटिंगहॅमशायरने 20 षटकांत 168 धावा केल्या. प्रत्युत्तरात वॉर्विकशायरची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्याच षटकातच अफ्रिदीकडून घेतलेल्या 4 विकेट पडल्या. त्यानंतर रॉब येट्स आणि ग्लेन मॅक्सवेल यांना नॉटिंगहॅमशायरचा पराभव मान्य नव्हता. रॉब येट्सने 46 चेंडूत 65 धावांची खेळी खेळली. जेकब बेथेलने 27 आणि जेक लिंटॉटने 27 रन केले. बाकी खेळाडूंच्या एकीमुळे नॉटिंगहॅमशायरचा पराभव टळला गेला.