Shaheen Afridi, PSL 2023: पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL 2023) अनेक थरारक सामने पहायला मिळत आहे. पेशावर जाल्मी आणि लाहोर कलंदर (LQ vs PZ) यांच्यात थरारक सामना पहायला मिळाला. शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) याने पीएसएल सामन्यात पेशावरचा सलामीवीर मोहम्मद हरिस (Mohammad Haris) याच्या बॅटचे दोन तुकडे केले. तर यानंतर पुढच्याच चेंडूवर त्याने बाबर आझमला (Babar Azam) क्लीन बोल्ड केलं. त्याचा व्हिडिओ सध्या (Viral Video) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेशावर जाल्मीला लाहोर कलंदरकडून (Lahore Qalandar) रोमहर्षक पराभव स्वीकारावा लागला. लाहोर कलंदरच्या विजयाचा शिल्पकार होता पाकिस्तानचा स्टार गोलंदाज  शाहीन शाह आफ्रिदी. शाहीन अफ्रिदीने (Shaheen Afridi) या सामन्यात 5 विकेट नावावर केली. त्यावेळी त्याची बॉलिंग आग ओकत असल्याचं पहायला मिळालं होतं. सामन्याचं आकर्षण ठरलं ती मोहम्मद हरिसची बॅट.


आणखी वाचा - Jasprit Bumrah Injury: जसप्रीत बुमराहचं करियर धोक्यात? आता नाही तर कधीच नाही... वाचा 3 महत्त्वाची कारणं!


पहिल्या ऑव्हरपासून शाहीन आफ्रिदी वाऱ्याच्या वेगाने गोलंदाजी करताना दिसला. या षटकातील पहिल्याच चेंडूंवर त्याने मोहम्मद हॅरिसची बॅट तोडली (Mohammad Harris bat broken). सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर त्याने हा चमत्कार करून दाखवला. आफ्रिदीची भेदक गोलंदाजीने पेशावर खेळाडू देखील घाबरले होते. मोहम्मद हॅरिस पहिल्या चेंडूवर कवर ड्राईव्ह (Cover drive) मारण्याचा प्रयत्न करत असताना त्याची बॅट तुटली. त्याचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय.


Mohammad Harris ची बॅट तुटली -



शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi Bowling) इथंच थांबला नाही, त्याने पुढच्याच चेंडूवर पाकिस्तानचा स्टार फलंदाज आणि पेशावरचा कॅप्टन बाबर आझमला  (Babar Azam Bold) माघारी पाठवलं. शाहीनने एक क्लास यॉर्कर (Yorker) बोल टाकला अन् सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. बाबरला देखील बॉल समजला नाही. स्टंप चार फूट लांब जाऊन पडला.


बाबर आझमच्या विकेटचा Video 



दरम्यान, कर्णधार शाहीन आफ्रिदीने 4 षटकात 40 धावा नक्कीच दिल्या, शाहीनने लागोपाठ दोन बॉलवर आपली जादू दाखवून दिली. नुकतंच लग्न करणाऱ्या शाहीनने दुखापतीनंतर दीर्घकाळाने क्रिकेटमध्ये पुनरागमन केलंय. त्यामुळे त्याचा रोष बॉलिंगमध्ये दिसून येत आहे.