मुंबई : क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा गोलंदाज आणि फलंदाज, विकेटकीपर आणि फलंदाज तसंच फलंदाज आणि फिल्डर यांच्यातील शाब्दिक युद्ध पाहिलं असेलच. शाब्दिक युद्ध मर्यादित असेल तर ते क्रिकेटसाठी चांगले मानले जाते, परंतु जेव्हा एखादा गोलंदाज आपला राग काढण्यासाठी फलंदाजावर चेंडू मारतो, तेव्हा...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असंच काहीसं चित्र बांग्लादेश विरूद्ध पाकिस्तान या सामन्यात पहायला मिळालं. क्रिकेट म्हणजे बॅट आणि बॉलमध्ये स्पर्धा असली पाहिजे. पण जर बॉलरने फलंदाजाला बॉल मारणं चुकीचं आहे. हेच पाकिस्तानी बॉलर शाहीन शाह आफ्रिदीने बांग्लादेशविरुद्धच्या टी-20 मॅचमध्ये केलं. आफ्रिदीला राग आला आणि त्याने रागाच्या भरात बांग्लादेशचा फलंदाज अफिफ हुसेनकडे चेंडू मारला.


सामन्यादरम्यान, आफ्रिदीने रागाने बांगलादेशचा फलंदाज अफिफ हुसेनकडे चेंडू मारला. ज्यामुळे तो जमिनीवर पडला आणि त्याला वेदनाही झाल्या. मात्र, फिजिओने प्राथमिक उपचार दिल्याने तो पुन्हा खेळण्यासाठी तयार झाला.



मात्र, यादरम्यान आफ्रिदीने त्याची माफी मागितली. सामन्याच्या पहिल्या डावातील तिसऱ्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर ही घटना घडली. याच ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर आफ्रिदीला राग आला, कारण हुसैनने त्याच्या गोलंदाजीवर सिक्स मारला होता.


चेंडू स्टंपवर फेकत असल्याचा दावा आफ्रिदी करतोय, पण त्याने चेंडू मुद्दाम मारला हे त्याच्या हावभावावरून स्पष्ट होतंय. कारण शॉट खेळत असताना अफिफ क्रीझच्या आत होता. यावरून शाहीन आफ्रिदीवरही टीका होतेय.