T20 World Cup 2022 : पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीने (pakistan former captain shahid afridi) टीम इंडियावर (team india) गंभीर आरोप केले आहे.  त्याने आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताची बाजू घेत असल्याचा आरोप केला आहे. आफ्रिदी म्हणाला, आयसीसी भारताला उपांत्य फेरीत नेण्याचा प्रयत्न करत आहे. भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यानंतर आफ्रिदीने हे वक्तव्य केले आहे. या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा पाच धावांनी पराभव केला होता. (Shahid Afridi on ICC) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 शाहीद आफ्रिदीचे गंभीर आरोप 


भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) सामन्याचा संदर्भ देत आफ्रिदीने आयसीसीच्या वृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एका पाकिस्तानी चॅनलशी संवाद साधताना तो म्हणाला, अॅडलेडचे मैदान किती ओले होते ते तुम्ही पाहिले असेलचं, असे असतानाही सामना पुन्हा सुरू झाला. आयसीसी भारतीय क्रिकेट संघाला सपोर्ट करत असल्याचं दिसत होतं. भारतीय संघाने कोणत्याही परिस्थितीत उपांत्य फेरी गाठावी, अशी आयसीसीची इच्छा आहे. (Shahid Afridi on ICC)


आफ्रिदी म्हणाला, मला असे वाटते की, आयसीसीचा टीम इंडियाकडे अधिक कल आहे. मात्र आफ्रिदी पाकिस्तानच्या खराब कामगिरीचा राग आयसीसीवर काढत आहे. वास्तविक, पाकिस्तान टी-२० विश्वचषकातून बाहेर होण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. भारताने त्यांच्या शेवटच्या गट सामन्यात झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिकाने नेदरलँड्सचा पराभव केला तर पाकिस्तान आणि बांगलादेश थेट विश्वचषकातून बाहेर होतील. या दोघांपैकी एकाचा पराभव झाला तरच पाकिस्तानी संघ स्पर्धेत टीकू शकतो. 


वाचा : T20 World Cup  सेमीफायनलबाबत चिंतेत टाकणारी बातमी!  


म्हणून टीम इंडियावर जळतोय शाहीद आफ्रिदी


पाकिस्तान  टी20 वर्ल्ड कप 2022च्या सेमीफायनलमध्ये पोहोचली आहे. यामुळेच ते टीम इंडियाच्या चांगल्या कामगिरीवर जळत आहेत. टीम इंडिया टी20 वर्ल्ड कप 2022च्या फायनलमध्ये जागा बनवण्याच्या मार्गावर आहे. यामुळे शाहीद आफ्रिदी अशी निरर्थक विधाने करत आहे. गेल्या वर्षी UAE मध्ये झालेल्या टी20 वर्ल्ड कप 2021मध्ये जेव्हा भारत ग्रुप सामन्यातूनच बाहेर गेला होता तेव्हा शाहीद आफ्रिदीने आयसीसीवर टीम इंडियाची बाजू घेत असल्याचा आरोप केला नव्हता.