मुंबई : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचे 'गेमचेंजर' हे आत्मचरित्र फार वादग्रस्त ठरत आहे. आफ्रिदीने गेम चेंजर या आत्मचरित्रातून अनेकांवर टीकेची तोप डागली आहे. त्या सोबतच त्याने क्रिकेटमधील अनेक किस्स्यांचा उलगडा केला आहे. स्पॉट फिक्सिंग होणार आहे, अशी माहिती मला आधीच होती, असा दावा त्याने आत्मचरित्रातून केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानची टीम २०१० साली इंग्लंड दौऱ्यावर होती. यावेळी पाकिस्तानचे काही खेळाडू आणि सट्टेबाज एकमेकांच्या संपर्कात असल्याची माहिती मला होती. असा दावा त्याने केला आहे. यासर्व प्रकरणी मी त्यावेळी टीम मॅनेजमेंटवर चांगलाच भडकल्याचा उल्लेख आफ्रिदीने आत्मचरित्रात केला आहे. 


त्यावेळेस वकार युनूस हे पाकिस्तानचे प्रशिक्षक होते. स्पॉट फिक्सिंग प्रकरणी सर्व पुरावे वकारकडे होते. त्याने तरीदेखील कोणतीच कारवाई केली नाही. स्पॉट फिक्सिंग प्रकरणी आयसीसीने पाकिस्तानचा ओपनर सलमान बट, बॉ़लर मोहम्म्द आसिफ आणि मोहम्मद आमीर या तिघांवर बंदी घातली होती.


वेगवान शतक


आफ्रिदीने १९९६ साली श्रीलंकेविरुद्ध वेगवान शतक करण्याचा रेकॉर्ड केला होता. त्याने ३७ बॉलमध्ये शतक ठोकले होते. विशेष म्हणजे आफ्रिदीने आपल्या वनडे कारकिर्दीतील दुसऱ्याच मॅचमध्ये ही किमया केली होती. यासोबतच तो कमी वयात तसेच वेगवान शतक ठोकणारा खेळाडूी ठरला होता. पंरतु ही खेळी त्याने सचिनच्या बॅटने केल्या असल्याची कबूली आत्मचरित्रातून दिली आहे.


सचिन तेंडुलकरनं आपली बॅट वकार युनूसला पाकिस्तानातील सियालकोट इथल्या दुकानातून नवी बॅट तयार करुन घेण्यासाठी दिली होती. मात्र वकारनं ती बॅट श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यासाठी आफ्रिदीला दिली होती.