मुंबई : 9 कोटी रुपये देऊन टीममध्ये घेतलेल्या खेळाडूचं एकूणच चित्र फ्लॉप असल्याचं दिसलं आणि मोठी निराशा झाली. आपल्या नावामुळे आयपीएलमध्ये चर्चेत आलेल्या शाहरुख खाननं आपल्या खेळानं सर्वांना नाराज केलं. आयपीएलच्या सगळ्या सामन्यात तो फार चांगली कामगिरी करू शकला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंजाब विरुद्ध दिल्ली झालेल्या सामन्यात तो पूर्ण फ्लॉप ठरला. पंजाब टीमने 9 कोटी रुपये देऊन त्याला टीममध्ये घेतलं मात्र तो पैसा पाण्यात गेल्यासारखंच झालं आहे. पंजाब टीम अवघ्या 115 धावांवर बाद झाली. 


पंजाब टीम 7 पैकी 4 सामने पराभूत झाली आहे. 7 सामन्यांमध्ये एकदाही शाहरुख खानची बॅट चालली नाही. त्याच्या बॅटिंगचा पंजाबला कोणताही फायदा झाल्याचं पाहायला मिळालं नाही. 


दिल्ली विरुद्ध बुधवारी झालेल्या सामन्यात शाहरुख खान 20 बॉलमध्ये 12 धावा करून आऊट झाला. शाहरुख खानची कामगिरी पाहता पंजाबचे 9 कोटी हळूहळू पाण्यात जात असल्याचं दिसत आहे. 


दिल्ली टीमने 9 विकेट्ने पंजाबचा पराभव केला. दिल्ली पाँईट टेबलमध्ये 6 सामन्यांपैकी 3 सामने जिंकून 6 पॉईंटसह 6 व्या स्थानावर आहे. पंजाबची टॉप चार फलंदाजी चांगली न राहिल्याने पुढची फळीही डळमळीत झाली आणि सामना हातून गेला.