Suhana Khan : तुझ्या ऐतिहासिक खेळीची मी साक्षीदार...; `या` मराठमोळ्या खेळाडूची फॅन झालीये शाहरुखची लेक
ही खेळी पाहता टीमचा मालक शाहरूख खानची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) देखील त्याची फॅन झाली आहे.
IPL 2023 : गुरुवारी आयपीएलच्या 16 व्या (IPL 2023) सिझनमध्ये रॉयल चॅलेंजर बंगळूरू (Royal Challengers Bangalore) विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यामध्ये केकेआरने आरसीबीची पराभव केला. यावेळी कोलकात्याच्या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो म्हणजे मराठमोळा खेळाडू शार्दुल ठाकुर (Shardul Thakur). शार्दूलने या सामन्यात तुफान फलंदाजी करत आरसीबीच्या टीमसमोर डोंगराएवढं लक्ष्य ठेवलं. दरम्यान ठाकूरची ही खेळी पाहता टीमचा मालक शाहरूख खानची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) देखील त्याची फॅन झाली आहे.
आरसीबीविरूद्ध लॉर्ड शार्दूलची तुफान फलंदाजी
केकेआरकडून प्रथम फलंदाजीला उतरताना रहमानउल्ला गुरबाजने टॉप ऑर्डरला येऊन चांगली खेळी केली. मात्र त्याच्याशिवाय इतर कोणत्याही खेळाडूला चांगली कामगिरी करणं जमत नव्हतं. अशावेशी लॉर्ड शार्दुल मैदानावर आला आणि तुफान फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. शार्दूलने अवघ्या 20 बॉल्समध्ये अर्धशतक ठोकलं. त्याच्या या खेळीमध्ये आणि 3 सिक्स आणि 9 फोर्सच्या मदतीने 68 रन्स ठोकले.
याशिवाय रिंकू सिंहने शार्दूलची मदत केली आणि केकेआरचा स्कोर 204 पर्यंत नेण्यास मदत केली. यावेळी शार्दूलची बॅटींग पाहून अनेकजण त्याचे चाहते बनले. यामध्ये शाहरूख खानची मुलगी सुहाना खानचा देखील समावेश होता.
सुहाना झाली शार्दूलची चाहती
आरसीबीविरूद्धच्या सामना जिंकल्यानंतर शाहरूख खानची मुलगी सुहाना खान म्हणाली, क्रिकेट पहायला मला जास्त आवजत नाही, मात्र शार्दूलची खेळी पाहून मला आता वाटू लागलंय की, हा किती उत्तम खेल आहे. मी यापूर्वी अशी फलंदाजी पाहिली नव्हती.
सुहाना पुढे म्हणाली की, शार्दूल तू खूप चांगला खेळलास. मला आनंद आहे की या ऐतिहासिक सामन्याची आणि तुझ्या उत्तम खेळीची मी साक्षीदार होते. तुझ्या या खेळीने तु कोट्यावधी लोकांना चाहते करून घेतलं असशील, त्यामध्ये माझाही समावेश आहे.
सुहाना शार्दुल ठाकूरला भेटली तेव्हा...
एखाद्या खेळाडूचा सन्मान कसा करावा हे सुहानाकडून शिकावं. आरसीबीविरूद्धच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देताना सुहाना शार्दुल ठाकूरला भेटली. यावेळी सुहानाच्या वागण्यात आदर दिसून आला. शार्दुलला ट्रॉफी दिल्यानंतर ती स्वतः जाऊन त्याच्या शेजारी उभी राहिली. दरम्यान तिच्या या वागण्याचं सोशल मीडियावर कौतुक देखील झालं.