MS Dhoni : धोनीने दिलेला `तो` सल्ला कामी आला, कॅप्टन शाई होपने असा पलटला सामना!
West Indies vs England 1st ODI Highlights : शाई होपच्या विजयामागे टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीचा (MS Dhoni) मोठा हात असल्याचं बोललं जातंय. शाई होप (Shai Hope) याने सामन्यानंतर विजयाचं सुत्र सांगताना धोनीचा उल्लेख केलाय.
Shai Hope On MS Dhoni : इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात (WI vs ENG) यजमान वेस्ट इंडिजने (West Indies) तगड्या इंग्लंडला मोठा धक्का दिला आहे. वेस्ट इंडिजच्या विजयाचा नायक कर्णधार शाई होप (Shai Hope ) ठरला. शाई होप याने झुंजावती शतक ठोकत वेस्ट इंडिजला ऐतिहासिक विजय मिळवून दिलाय. घरच्या मैदानावर एकदिवसीय इतिहासातील वेस्ट इंडिजचा हा सर्वात मोठा विजय ठरला आहे. मात्र, शाई होपच्या विजयामागे टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीचा (MS Dhoni) मोठा हात असल्याचं बोललं जातंय. शाई होप याने सामन्यानंतर विजयाचं सुत्र सांगताना धोनीचा उल्लेख केलाय.
टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर हॅरी ब्रूकच्या (71) शानदार अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंड संघाने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 325 धावा केल्या होत्या. त्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या हातातून सामना जाईल, अशी परिस्थिती होती. वेस्ट इंडिजने 7 चेंडू आणि 4 विकेट्स शिल्लक असताना ही धावसंख्या गाठली आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात गेम चेंजर ठरला तो शाई होप... त्याने 83 चेंडूत 4 चौकार आणि 7 गगनचुंबी षटकारांच्या मदतीने नाबाद 109 धावांची खेळी साकारली. त्यामुळे त्याला प्लेयर ऑफ मॅचचा अवॉर्ड देखील मिळाला. विजयानंतर शाई होपने धोनीचे आभार मानले.
काय म्हणाला Shai Hope?
आम्ही संपूर्ण सामन्यात (West Indies vs England) चांगली खेळी केली. फलंदाजीमुळे संपूर्ण सामना फिरला. आम्ही सामन्यात अनेक कॅच सोडले. आम्हा सर्वोत्तम टीम व्हायचं असेल तर कॅच पकडले गेले पाहिजे. सलामीवीरांना चांगली कामगिरी केली. तर शतक ठोकून मला देखील आनंद झाला आहे. काही वेळापूर्वी मी एमएस धोनीशी गप्पा मारल्या होत्या आणि त्याने मला सांगितले की तुमच्या विचारापेक्षा तुमच्याकडे नेहमी क्रीजवर जास्त वेळ असतो. त्याचे शब्द माझ्या डोक्यात बसले अन् मी त्याचा फायदा करून घेतला, असं शाई होपने म्हटलं आहे.
वेस्ट इंडिजचा संघ - ब्रँडन किंग , अॅलिक अथानाझे , केसी कार्टी , शाई होप (C) , शिमरॉन हेटमायर , शेरफेन रदरफोर्ड , रोमॅरियो शेफर्ड , यानिक कॅरिया , अल्झारी जोसेफ , गुडाकेश मोती , ओशाने थॉमस.
इंग्लंडचा संघ - फिलिप सॉल्ट, विल जॅक्स, झॅक क्रॉली, बेन डकेट, हॅरी ब्रूक, जॉस बटलर (C), लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ब्रायडन कार्स, रेहान अहमद, गस ऍटकिन्सन.