नवी दिल्ली : क्रिकेटच्या मैदानात रेकॉर्ड झाल्याने प्लेअर्स चर्चेत येतात. मात्र, बांगलादेशच्या टीममधील एक प्लेअर सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.


(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेटच्या मैदानात दोन टीम्समधील प्लेअर आपआपसात भिडल्याचं तुम्ही पाहिलं असेलच. पण, अंपायरसोबत वाद झाल्याचं तुम्ही फारच कमी वेळा पाहीलं असेल. मात्र, बांगलादेशमध्ये सुरु असलेल्या बांगलादेश प्रिमियर लीगमध्ये एक विचित्र दृश्य पहायला मिळालं.


व्हिडिओ झाला व्हायरल


या मॅचमध्ये बांगलादेशचा ऑल राऊंडर आणि ढाका डायनामाईट्सचा कॅप्टन शाकिब अली हसनने मॅच दरम्यान अंपायरसोबत गैरवर्तन केलं आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.


सोशल मीडियात टीका 


हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने सोशल मीडियात युजर्स शाकिब अली हसनवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.



झालं असं की, शाकिबने बॉलिंग दरम्यान आऊटची अपील केली मात्र, अंपायरने आऊन न दिल्याने तो चांगलाच भडकला.


५०% रक्कम कापण्यात आली


शाकिबने केलेल्या या कृत्यामुळे त्याच्या मॅच फीमधून ५०% रक्कम कापण्यात आली आहे. बीसीबी कोड ऑफ कंडक्टच्या लेवर २ नुसार शाकिब दोषी आढळला आहे. शाकिबच्या व्यतिरिक्त या मॅचमध्ये कॉमिला विक्टोरियंसचा बॉलर हसन अली हा सुद्धा दोषी आढळला आहे.