Shakib Al Hasan BPL : शाकिबला व्हायचंय `नायक`चा अनिल कपूर, म्हणाला `सुतासारखं सरळ करतो`
Bangladesh Premier League: तुला बीपीएलचा मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) बनवल्यानंतर तू काय करशील?, असा प्रश्न शाकिब अल हसनला विचारण्यात आला होता. त्यावर...
Shakib Al Hasan Nayak Film BPL 2023 : बांगलादेशमध्ये खेळवली जाणाऱ्या प्रसिद्ध बांगलादेश प्रिमियम लीगला (BPL) येत्या काही दिवसात सुरूवात होणार आहे. अशातच बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनने (Shakib Al Hasan) बांगलादेश प्रीमियर लीगच्या व्यवस्थापनावर जोरदार टीका केली. नव्या हंगामाची सुरूवात होण्याआधी एक पत्रकार परिषद (Press Conference) आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत शाकिब अनेक प्रश्नांची उत्तरे देताना दिसला. त्यावेळी शाकिबने अनिल कपूरच्या (Anil Kapoor) नायक चित्रपटाचा उल्लेख केला. (shakib al hasan criticize bangladesh premier league management give example of nayak film marathi news)
तुला बीपीएलचा मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) बनवल्यानंतर काय करशील?, असा प्रश्न शाकिब अल हसनला विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना शाकिबने गाजलेला हिंदी चित्रपट नायकचं (Nayak) उदाहरण देत उत्तर दिलं.
काय म्हणाला Shakib Al Hasan?
मला जर बांगलादेश प्रीमियर लीगचा सीईओ (BPO CEO) बनवण्यात आलं तर मी 1 ते 2 महिन्यात सगळ्या गोष्टी सुरळीत करेन. तुम्ही नायक चित्रपट (Nayak Movie) पाहिलाच असले? जर तुम्हाला काही करायचं असेल तर ते तुम्ही एका दिवसातही करू शकता, असं शाकिब (Shakib Al Hasan) म्हणाला.
मी खेळाडूंचा ड्राफ्ट आणि लिलाव टायमिंगवर करेल. ज्यावेळी रिकामा वेळ असेल, बांगलादेश प्रीमियर लीग (BPL) तेव्हाच ठेवेन, असंही तो यावेळी म्हणालाय. बीपीएल कोणत्याही पद्धतीनं बांगलादेशमधील सर्वात मोठी स्पर्धा असल्यासारखं वाटत. इथं खेळाडूंची जर्सी देखील अद्याप नसल्याचं मला समजलंय, असं म्हणत त्याने नाराजी व्यक्त केली आहे.
आणखी वाचा - ICC T20 Rankings : आयसीसीच्या रँकिंगमध्ये सुर्यकुमार शिखरावर, ईशान-हुडाची गरूड झेप!
दरम्यान, शाकिब अल हसनच्या या वक्तव्यानंतर बीपीएलचे आयोजक खडबडून जागे झाल्याचं पहायला मिळतंय. खेळाडूंना मिळणारं मानधन देखील वेळेवर देत नसल्याने नाराजीचं वातावरण होतं. आगामी आगामी आयपीएलमध्ये (IPL) शाकिब कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे.