ICC T20 Rankings : आयसीसीच्या रँकिंगमध्ये सुर्यकुमार शिखरावर, ईशान-हुडाची गरूड झेप!

ICC T20 rankings Suryakumar retains top: आयसीसीने (ICC) जाहीर केलेल्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीमध्ये 833 रेटिंग गुणांसह सूर्यकुमार यादव पहिल्या स्थानावर विराजमान आहे. तर...

Updated: Jan 5, 2023, 06:46 PM IST
ICC T20 Rankings : आयसीसीच्या रँकिंगमध्ये सुर्यकुमार शिखरावर, ईशान-हुडाची गरूड झेप!  title=
ICC T20I Ranking

ICC T20I Ranking : टीम इंडियाचा (Team India) स्टार बॅटर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) पुन्हा एकदा चमकला आहे. आयसीसीने नुकतीच ताजी टी 20 रँकिंग (ICC T20 Ranking) जाहीर केली आहे. सूर्याने या रँकिंगमध्ये कारकीर्दीतील सर्वोत्तम स्थान कायम ठेवलंय. सुर्यकुमारबरोबरच सलामीवीर ईशान किशनच्या (Ishan Kishan) क्रमवारीत सुधारणा झाल्याचं पहायला मिळतंय. तर कॅप्टन हार्दिकने देखील आपली चमक दाखवून दिली आहे. (ICC T20 rankings Suryakumar retains top spot Kishan jumps 10 places to 23rd marathi news)

आयसीसीने (ICC) जाहीर केलेल्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीमध्ये 833 रेटिंग गुणांसह सूर्यकुमार यादव पहिल्या स्थानावर विराजमान आहे. तर दुसऱ्या स्थानी मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) 836 गुणांसह दुसऱ्या स्थानी कायम असल्याचं पहायला मिळतंय. तसेच 643 अंकांसह विराट कोहली  (Virat Kohli) 13 व्या क्रमांकावर असल्याचं पहायला मिळतंय. तर के एल राहूलच्या (K L Rahul) क्रमवारीत 576 अंकासह एका पायदानाची घसरण झाली.

असं असलं तरी सलामीवीर ईशान किशनच्या (Ishaan Kishan) खात्यात 567 अंक जमा झाले आहेत. ईशानने थेट दहा पाऊल पुढे पाऊल टाकली आहेत. तर श्रेयस अय्यरच्या (shreyas iyer) क्रमवारीत दोन अंकाची घट झाल्याचं पहायला मिळतंय. 469 अंकासह अय्यर 57 व्या स्थानी आहे. तर श्रीलंकेविरुद्ध धडाकेबाज खेळी करणाऱ्या दीपक हुडाने (Deepak Hooda) टॉप-100 फलंदाजांमध्ये प्रवेश केलाय.

आणखी वाचा - IND vs SL 2nd T20: Team India च्या प्लेइंग 11 मध्ये 'हा' स्टार खेळाडू IN, संघाला दणदणीत विजय मिळवून देणार!

दरम्यान, गोलंदाजीमध्ये भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) 11 व्या स्थानी आहे. तसेच श्रीलंकेचा हसरंगा (Wanindu Hasaranga) 709 गुणांसह अव्वल स्थानी कायम असल्याचं पहायला मिळतंय. तर अर्शदीप सिंग 21 व्या स्थानी आहे. तर गोलंदाजीत हार्दिकच्या (Hardik Pandya) रँकिंगमध्ये 10 अंकांची मोठी वाढ झालीये. तर बुमराहला (Bumrah) मोठा फटका बसल्याचं दिसतंय. 424 गुणांसह बुमराहची 82 व्या स्थानी घसरण झाली.